रोहयो मजुरांचे ‘आधार’ १0 जानेवारीपर्यंत ‘वेबसाईट’वर!
By admin | Published: January 7, 2015 12:18 AM2015-01-07T00:18:21+5:302015-01-07T00:18:21+5:30
अमरावती विभागात आधार क्रमांक नोंदीचे काम तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश.
संतोष येलकर/अकोला: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामांवरील मजुरांना आधार क्रमांकावर मजूरी दिली जाणार आहे. त्यासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात १0 जानेवारीपर्यंत रोहयो मजुरांचे आधार क्रमांक नरेगा वेबसाईटवर नोंद करण्यात येणार आहेत. ९ मे २0१४ च्या शासन परिपत्रकानुसार राज्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) कामांवरील सर्व मजुरांना दिली जाणारी मजूरी आधार बेस प्रदान केली जाणार आहे. त्यामध्ये मजुरांचा आधार क्रमांक, त्यांच्या बँक खात्याशी संलग्नित करुन, मजुरीची रक्कम थेट मजुरांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्याकरिता रोहयो अंतर्गत मजुरांचे आधार क्रमांक गोळा करुन, त्याची नोंद नरेगा सॉफ्ट वर करण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार मजुरांचे आधार क्रमांक नोंदविण्याचे काम गत नोव्हेंबरपासून अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यात सुरु करण्यात आले आहे. या कामाचा ३ जानेवारी रोजी विभागीय उपआयुक्तांकडून (रोहयो)ह्यऑनलाईन ह्ण आढावा घेण्यात आला. त्यामध्ये विभागीय वाशिम जिल्हा वगळता उर्वरित चार जिलंचे काम समाधानकारक नसल्याचे निदर्शनास आले. त्यानुषंगाने अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात रोहयो कामांवरील सर्व मजुरांचे आधार क्रमांक डाटा एन्ट्री ऑपरेटर्सकडून १0 जानेवारीपर्यंत नरेगा वेबसाईट वर नोंदविण्याचे काम शंभर टक्के पूर्ण करावयाचे आहे. यासंदर्भात विभागीय उपआयुक्त (रोहयो) मार्फत विभागातील पाचही जिल्हाधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम समन्वयक आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सह जिल्हा कार्यक्रम समन्वयकांना ३ जानेवारी रोजी पत्र पाठविण्यात आले आहे. रोहयो कामांवरील मजुरांच्या मजुरीचे प्रदान आधार बेस नुसार होणार आहे. त्यामुळे मजुरांचे आधार क्रमांक गोळा करुन, १0 जानेवारीपर्यंत आधार क्रमांक नरेगा वेबसाईटवर नोंदविण्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचना विभागातील संबंधित अधिकार्यांना पत्राव्दारे देण्यात आल्या असल्याचे विभागीय उपआयुक्त एस .टी.टाकसाळे यांन्ी स्पष्ट केले.