रोजचंच रडगाणं ! मध्य रेल्वे विस्कळीत, आसनगाव ते वाशिंद रेल्वेसेवा पुन्हा ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2017 10:08 AM2017-09-05T10:08:04+5:302017-09-05T10:09:27+5:30
मध्य रेल्वेची वाहतूक सेवेवर पुन्हा परिणाम झाला आहे. यामुळे मंगळवारचा दिवसही मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी त्रासदायकच ठरणार आहे. आसनगाव ते वाशिंददरम्यानची रेल्वे सेवा पुन्हा ठप्प झाली आहे. ट्रॅक खालील भराव खचल्यानं रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे.
कल्याण, दि. 5 - मध्य रेल्वेची वाहतूक सेवेवर पुन्हा परिणाम झाला आहे. यामुळे मंगळवारचा दिवसही मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी त्रासदायकच ठरणार आहे. आसनगाव ते वाशिंददरम्यानची रेल्वे सेवा पुन्हा ठप्प झाली आहे. ट्रॅक खालील भराव खचल्यानं रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. यामुळे ऐन कार्यालय गाठण्याच्या वेळी प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. उशीर होत असल्याने हैराण झालेल्या प्रवाशांनी अखेर ट्रॅकवर उतरुन चालत पुढील स्टेशन गाठलं. मध्य रेल्वेच्या सततच्या कटकटीला कंटाळलेले प्रवासी संपात व्यक्त करत आहेत. या खोळंब्यामुळे सकाळपासून मध्य रेल्वेची आसनगाव ते वासिंद रेल्वेसेवा बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे कल्याण-कसारा रेल्वे मार्ग पूर्णतः बंद झाला आहे. मुंबईकडे निघालेल्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. 29 ऑगस्ट रोजी मध्य रेल्वेच्या आसनगाव-वासिंद स्थानकांदरम्यान नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस घसरून मोठा अपघात झाला होता. आसनगाव आणि वाशिंददरम्यात वेहरोळी वस्तीजवळ नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे 9 डबे घसरले होते. रेल्वे रुळावर पावसामुळे दगड-माती आल्यानं मंगळवारी (29 ऑगस्ट) सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. यानंतर तब्बल 4 दिवस या मार्गावरील वाहतूक ठप्प होती. शनिवारी हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णत: खुला करण्यात आला होता. मात्र आता पुन्हा भराव खचल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.