शिवसेना भाजपाची युती व्हावी ही मुख्यंत्र्यांची भूमिका - सुधीर मुनगंटीवार
By admin | Published: October 20, 2016 03:10 PM2016-10-20T15:10:19+5:302016-10-20T15:10:19+5:30
ज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसाठी भाजपा-शिवसेना युती व्हावी. मुख्यमंत्र्यांचीदेखील अशीच भुमिका आहे असे मत सुधीर मुनगंटीवार यांनी मांडले.
Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २० - गेल्या २५ वर्षांचा अभ्यास केला असता राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसाठी भाजपा-शिवसेना युती व्हावी. मुख्यमंत्र्यांचीदेखील अशीच भुमिका आहे, असे प्रतिपादन राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
युतीच्या दृष्टीने गेल्या आठवड्यात मुंबई येथे दोन्ही पक्षाच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यात व्यक्तिगत स्वरुपाचे आरोप-प्रत्यारोप होऊ नयेत. यामुळे संदिग्धता व शंका निर्माण होते. उभय पक्षांत आदर्श आचारसंहिता असावी, अशी भुमिका मांडण्यात आली होती. गेल्या १५ वर्षांत कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांच्या काळात जे घडले ते युतीच्या काळात होऊ नये, असा प्रयत्न आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकींत युतीबाबतचा निर्णय स्थानिक कार्यकर्ते घेत असतात. बहुसंख्य कार्यकर्त्यांची इच्छा युती व्हावी अशीच आहे. ज्यांचा ‘वॉर्ड’ दुसºया पक्षाच्या उमेदवारासाठी सोडला जातो, अशा कार्यकर्त्यांना युती होऊ नये असे वाटते. गेल्या निवडणूकांत मुंबई, पुणे, ठाणे आदि ठिकाणी युती झाली होती. परंतु नाशिकमध्ये युती न झाल्याचा फटका बसला.