आयकॉन्स ऑफ एज्युकेशन महाराष्ट्रमागची लोकमतची भूमिका

By admin | Published: February 19, 2016 05:21 PM2016-02-19T17:21:48+5:302016-02-19T17:21:48+5:30

शिक्षणाशी निगडीत प्रत्येक महत्त्वाच्या घटकाला घेऊन मंथन होण्याचीही गरज आहे. याच उद्देशाने ‘लोकमत’ने हे पाऊल उचलले आहे.

The role of the Lokmanty of the Arts of Education Maharashtra | आयकॉन्स ऑफ एज्युकेशन महाराष्ट्रमागची लोकमतची भूमिका

आयकॉन्स ऑफ एज्युकेशन महाराष्ट्रमागची लोकमतची भूमिका

Next
पुणे, दि. 19 - शालेय व उच्च शिक्षणात सध्या खूप वेगवेगळ्या प्रकारची स्थित्यंतरे सुरू आहेत. प्रत्येकाला शिक्षणाच्या हक्क यापासून ते शिक्षणाच्या दर्जापर्यंत विविध बाबींवर सध्या उहापोह सुरू आहे. इतकेच नव्हे तर सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या वैचारिक, सामाजिक बदलांचे केंद्र निरनिराळे शैक्षणिक कॅम्पस ठरत आहेत. हैद्राबाद विद्यापीठातील रोहित वेमूलाची घटना असो की जेएनयुमधील घटना. बदलाच्या हाका आणि चर्चा या विद्यापीठींमध्ये दिसत आहेत. देशातील युवक जास्तीत जास्त सजग होण्याचा प्रयत्न करू लागला आहे. हे सगळे बदल तटस्थपणो पाहणो एवढीच आपण भूमिका कशी घेणार? 
 
या बदलांच्या विविध कंगो:यांचा विचार करणो, शिक्षणातील आव्हाने आणि अपेक्षित बदलांच्या दिशेने वाटचाल यावर सृजनात्मक विचार होण्याची गरज ‘लोकमत’ समूहाला वाटते.  आपल्या देशातील सर्वाधिक तरूण गटाला अधिकाधिक विधायकतेकडे नेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारे ‘शिक्षण’ सर्वांगाने समजून घेण्याची निश्चितच आता वेळ आली आहे. त्यासाठी शिक्षणाशी निगडीत प्रत्येक महत्त्वाच्या घटकाला घेऊन मंथन होण्याचीही गरज आहे. याच उद्देशाने ‘लोकमत’ने हे पाऊल उचलले आहे.
 
बदलत्या स्थित्यंतराच्या पाश्र्वभूमीवर संस्थाचालक, प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षण सचिव, विभागप्रमुख, प्राध्यापक, विविध संघटना,  पालकांचे प्रतिनिधी ते थेट राज्याचे शिक्षणमंत्री यांनी एकत्रितपणो एकमेकांसमोर येणो महत्त्वाचे आहे. त्यामुळेच या सर्व घटकांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा ‘लोकमत’ला मोह  झाल्याशिवाय राहिला नाही. निव्वळ एका व्यासपीठावर आणणोच नव्हे तर त्यानिमित्ताने काही प्रश्न उपस्थित करून त्यांचा धांडोळा घेणो, त्यांची चर्चा घडविणो, मंथन करून त्यातून कृतीशील धोरण ठरविणो ही तितकेच महत्त्वाचे वाटते.  

 

Web Title: The role of the Lokmanty of the Arts of Education Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.