प्रकाश आंबेडकरांची भूमिका योग्य
By admin | Published: September 18, 2016 12:32 AM2016-09-18T00:32:32+5:302016-09-18T00:32:32+5:30
मराठा मूक क्रांती मोर्चाच्या विरोधात प्रतिमोर्चे काढू नका, असे आवाहन भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी नुकतेच केले
पुणे : मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मराठा मूक क्रांती मोर्चाच्या विरोधात प्रतिमोर्चे काढू नका, असे आवाहन भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी नुकतेच केले आहे. त्यांच्या या भूमिकेचे स्वागत संभाजी ब्रिगेडने केले असून, मराठा समाज कोणत्याही समाजाविरोधात रस्त्यावर उतरलेला नसल्याचे संघटनेने स्पष्ट केले.
ब्रिगेडच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकानुसार, कोपर्डी येथील घटनेनंतर राज्यभरातील मराठा समाज मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून मराठा क्रांती मूक मोर्चाच्या माध्यमातून सरकार व यंत्रणांमधील रोष संवेदनशील मार्गाने व्यक्त करत आहे. हे लोण महाराष्ट्रभर पसरत आहे. मूक मोर्चाबाबत गैरसमज पसरवून दलित बांधवांना प्रतिमोर्चा काढण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातूनही दलित समाजातील बांधवनिंी मोर्चे काढू नयेत असे आवाहन केले आहे. विरोधात प्रतिमोर्चे काढू नका, असे आवाहन भारिपचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
>या पूर्वी आरक्षण मर्यादा वाढविण्याबाबत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनीही भूमिका घेतली असल्याने ब्रिगेडने या दोन्ही नेत्यांच्या भूमिकांचे स्वागत केले असल्याचे पत्र संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर आणि प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर यांनी प्रसिद्धीस दिले आहे.