औरंगाबादेत मिरवणुकीवर दगडफेक

By Admin | Published: March 9, 2015 01:31 AM2015-03-09T01:31:39+5:302015-03-09T01:31:39+5:30

शहरातील संजयनगर, बायजीपुरा भागात रविवारी सायंकाळी शिवजयंती मिरवणुकीवर समाजकंटकांनी दगडफेक केली. त्यानंतर दोन समाजाचे गट

Rolling stones in Aurangabad | औरंगाबादेत मिरवणुकीवर दगडफेक

औरंगाबादेत मिरवणुकीवर दगडफेक

googlenewsNext

औरंगाबाद : शहरातील संजयनगर, बायजीपुरा भागात रविवारी सायंकाळी शिवजयंती मिरवणुकीवर समाजकंटकांनी दगडफेक केली. त्यानंतर दोन समाजाचे गट समोरासमोर आल्याने परिसरात काही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला होता. वेळीच मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी पोहोचल्याने अनर्थ टळला.
या दगडफेकीत सचिन जगन्नाथ नरवडे, अंकुश वेळंजकर, अरुण राऊतराय, परशू डोळस आणि राजीव ठाकरे हे जखमी झाले असून, त्यांना घाटीत दाखल करण्यात आले आहे. या प्रकारानंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रविवारी तिथीनुसार शिवजयंती असल्याने संजयनगरातून सर्वपक्षीय शिवजयंती उत्सव समितीने सायंकळी वाजतगाजत मिरवणूक काढली. ही मिरवणूक गल्ली नंबर ७ बी येथे पोहोचली. तेव्हा काही घरांच्या छतावरून मिरवणुकीवर अचानक तुफान दगडफेक सुरू झाली. त्यामुळे एकच धावपळ उडाली.
सुमारे २० मिनिटे ही दगडफेक सुरू असल्याचे प्रत्यक्षदर्शी राजीव ठाकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
पोलीस उपायुक्त अरविंद चावरिया हे संजयनगरात दाखल झाले. पोलिसांचे दंगा काबू वज्र वाहनही सोबत होते. (प्रतिनिधी)

Web Title: Rolling stones in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.