मुलींना चापट मारून पळणा-या रोमिओला दामिनी पथकाचा हिसका

By Admin | Published: July 7, 2017 06:50 PM2017-07-07T18:50:04+5:302017-07-07T18:50:04+5:30

सिडको एन-१ येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील मुलींना चापट मारून पळून जाणा-या रोमिओला शहर पोलिसांच्या दामिनी पथकाने शोधून काढले.

Romance of the girls, who are chasing the girls, and the humiliation of the Damini squad | मुलींना चापट मारून पळणा-या रोमिओला दामिनी पथकाचा हिसका

मुलींना चापट मारून पळणा-या रोमिओला दामिनी पथकाचा हिसका

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 07 - सिडको एन-१ येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील मुलींना चापट मारून पळून जाणा-या रोमिओला शहर पोलिसांच्या दामिनी पथकाने शोधून काढले. त्याने आतापर्यंत सहा मुलींची छेड काढल्याचे समोर आले असून त्याच्याविरूद्ध एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची कारवाई सुरू आहे. 
मीर मुजाहेद हुसेन(२७,रा. देवडी बाजार, सिटीचौक परिसर)असे अटकेतील रोमिओचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती देताना पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे म्हणाल्या की, सिडको एन-१ येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील ट्युशनला जाणा-या विद्यार्थींनीना एक मोपेडस्वार सतत छेडतो. तो मुलींना चापट मारून मोपेडेने पसार होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या अनुषंगाने दामिनी पथकाला याविषयी कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार दामिनी पथकाच्या पोलीस नाईक स्वाती बनसोड, कॉन्स्टेबल कोमल निकाळजे, पूनम झाल्टे, चालक नेहा यांनी परिसरात मुलींच्या ट्युशनच्यावेळी गस्त वाढविली. मात्र आरोपी त्यांना तेथे दिसला नाही. यामुळे या पथकाने घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. मुलींच्या तक्रारीनुसार रोमिओ हा पांढरा रंग असलेल्या ०१३३ क्रमांकाच्या मोपेडने येतो असे नमूद केले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पांढ-या रंगाच्या आणि ०१३३ हा क्रमांकाची मोपेड पोलिसांना घटनास्थळी दिसली. परंतु या दुचाकीची सिरीज न समजू शकली नव्हती. यामुळे पोलिसांनी आरटीओकडून ०१३३ क्रमांकाच्या दहा वर्षापूर्वीच्या मोपेड मालकाची नावे आणि पत्ते मिळविली असता या क्रमांकाच्या चार मोपेड शहरात असल्याचे समजले. चारही मोपेडचालकांना बोलावून घेण्यात आले. त्यानंतर गुप्तपणे तक्रारदार मुलींना दाखविले असता चारपैकी एक असलेल्या मीर मुजाहेद हुसेन हाच त्यांना सतत छेड काढणारा असल्याचे त्यांनी लगेच ओळखले. 
आरोपी मुजाहेद विवाहित असून तो छावणी बाजारात शेळ्यांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो,अशी माहिती पोलिसांनी दिली. आरोपीविरूद्ध एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती दामिनी पथकाने दिली.

Web Title: Romance of the girls, who are chasing the girls, and the humiliation of the Damini squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.