४० मिनिटांत साकारली सात एकरात रांगोळी
By Admin | Published: April 11, 2016 03:14 AM2016-04-11T03:14:55+5:302016-04-11T03:14:55+5:30
शहरातील विविध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सेवाभावी संस्थांच्या मदतीने खेडी (ता. जळगाव) शिवारातील तब्बल ७ एकर परिसरात ‘जल हैं तो कल हैं’ असा संदेश देणारी विश्वविक्रमी रांगोळी
जळगाव : शहरातील विविध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सेवाभावी संस्थांच्या मदतीने खेडी (ता. जळगाव) शिवारातील तब्बल ७ एकर परिसरात ‘जल हैं तो कल हैं’ असा संदेश देणारी विश्वविक्रमी रांगोळी अवघ्या ४० मिनिटांत रविवारी सकाळी साकारण्यात आली.
राज्याला भेडसावणाऱ्या दुष्काळी परिस्थितीची जाणीव करून देत, जल बचतीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने शासनाचा जलसंपदा विभाग, जैन इरिगेशन सीस्टिम्स लिमिटेड व नीर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम हाती घेण्यात आला. सुमारे ७०० स्वयंसेवकांच्या मदतीने सकाळी ८.३० वाजता ही रांगोळी साकारण्यास सुरुवात झाली. त्यानंतर अवघ्या ४० मिनिटांतच म्हणजे, ९ वाजून १० मिनिटांनी रांगोळी पूर्ण झाली. महाकाय रांगोळी साकारण्यासाठी तब्बल ६५ टन रांगोळीचा वापर करण्यात आला. सात एकर भूखंडावर ५५० चौरस फूट आकारात ही रांगोळी काढण्यात आली. (प्रतिनिधी)