वीज कोसळून हनुमान मंदिराचे छत कोसळले; मूर्तीवर ओरखडाही नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 02:34 PM2023-09-08T14:34:27+5:302023-09-08T14:35:26+5:30

धुळ्यातील शिरपूरमध्ये घडली घटना, मंदिरात खेळणारी मुले थोडक्यात बचावली.

Roof of Hanuman temple collapsed due to lightning; no scratch on the idol | वीज कोसळून हनुमान मंदिराचे छत कोसळले; मूर्तीवर ओरखडाही नाही

वीज कोसळून हनुमान मंदिराचे छत कोसळले; मूर्तीवर ओरखडाही नाही

googlenewsNext

धुळे: धुळे जिल्ह्यातील शिरपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील भोयटी गावातील हनुमान मंदिरावर वीज कोसळली. विजेमुळे मंदिराचे छत कोसळले, भिंतींना मोठे तडे गेले. पण, आश्चर्याची बाब म्हणजे, मंदिरातील बजरंगबलीच्या मूर्तीला धक्काही लागला नाही. विजेच्या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

सविस्तर माहिती अशी की, गुरुवारी सायंकाळची पाच वाजण्याच्या सुमारास गावात मोठा आवाज आला. ग्रामस्थांनी बाहेर येऊन पाहिले तर त्यांना मंदिरावर विज कोसळल्याचे आढळले. तात्काळ ग्रामस्थांनी मंदिरात जाऊन पाहणी केली, तेव्हा त्यांना मंदिराचे छत कोसळल्याचे दिसले. तसेच, भिंतींना तडेही गेले होते. सर्वांना वाटले की, हनुमानाच्या मूर्तीचे नुकसान झाले असावे, पण मूर्तीला थोडीही इजा झाली नाही. यानंतर ग्रामस्थांनी या घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाला दिली.

ग्रामस्थ याला चमत्कार मानतात
विज कोसळली तेव्हा मंदिराच्या परिसरात लहान मुलेही खेळ होती, पण सुदैवाने त्यांना काही इजा झाली नाही. गावकरी याला चमत्कार मानत आहेत. ते म्हणतात की, हनुमानाच्या शक्तीमुळे मूर्ती किंवा मुलांना काहीही झाले नाही. मंदिराचे नुकसान झाले आहे, पण याची दुरुस्ती केली जाऊ शकते.

Web Title: Roof of Hanuman temple collapsed due to lightning; no scratch on the idol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.