रूम नंबर ४२१ ते ‘वर्षा’!
By Admin | Published: November 6, 2014 04:14 AM2014-11-06T04:14:58+5:302014-11-06T04:14:58+5:30
मॅजेस्टिक आमदार निवासातील खोलीपेक्षा वर्षा बंगला चांगला आहे ना, मग दुरुस्तीची काय गरज आहे, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करताच अधि
मुंबई : मॅजेस्टिक आमदार निवासातील खोलीपेक्षा वर्षा बंगला चांगला आहे ना, मग दुरुस्तीची काय गरज आहे, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करताच अधिकारी चकित झाले. कोणताही गाजावाजा आणि समारंभ न करता फडणवीस गुरुवारी वर्षावर ‘गृहप्रवेश’ करणार आहेत.
मुख्यमंत्री पदावरील व्यक्ती बदलली की, वर्षा बंगल्याची अंतर्गत रचनाही बदलते, असा आजवरचा शिरस्ता. पण या गोष्टींना फाटा देत फडणवीस यांनी मॅजेस्टिक आमदार निवासातील रूम नं. ४२१ सोडून वर्षा बंगल्यावर आपला मुक्काम हलविण्याचे ठरविले आहे. मॅजेस्टिकमधील याच खोलीतून फडणवीस यांची आजवरची राजकीय वाटचाल झाली. त्यामुळे या खोलीशी त्यांचे भावनिक नाते निर्माण झाले होते. ते म्हणाले की, कवयित्री इंदिरा संत यांनी त्यांच्या रूमला सखी मानून तिला ‘रुमा’ असे नाव दिले होते. रूम नं. ४२१ ही माझी रुमाच आहे. विधिमंडळ अधिवेशनात मी विविध विषयांवर जी भाषणे दिली त्यांची तयारी रात्र रात्र जागून मी खोलीतच केली आहे. (विशेष प्रतिनिधी)