पतंगाच्या नादात कटली दोघांच्या जीवनाची दोरी

By Admin | Published: January 16, 2015 01:06 AM2015-01-16T01:06:03+5:302015-01-16T01:06:03+5:30

पतंगबाजीच्या नादात एका लहानग्यासह दोघांचा बळी गेला. नंदनवन आणि धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या. तर, उपराजधानीतील विविध भागात ५० वर लोक पतंगबाजीमुळे गंभीर जखमी झाले.

A rope of both the lives of the cats in the nets of the moth | पतंगाच्या नादात कटली दोघांच्या जीवनाची दोरी

पतंगाच्या नादात कटली दोघांच्या जीवनाची दोरी

googlenewsNext

नागपूर : पतंगबाजीच्या नादात एका लहानग्यासह दोघांचा बळी गेला. नंदनवन आणि धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या. तर, उपराजधानीतील विविध भागात ५० वर लोक पतंगबाजीमुळे गंभीर जखमी झाले.
देवांशू विजय अहेर (वय ९) सदभावना नगर (नंदनवन) मध्ये राहात होता. तो दुसरीचा विद्यार्थी होता. त्याच्या वडिलांचे बांगड्याचे दुकान असून, आई गृहिणी आहे. त्याला एक भाऊ आहे. देवांशूचे आजोबा राजारामजी जैन मिरे लेआऊटमध्ये राहतात. आज दुपारी देवांशू त्यांच्याकडे पतंग उडवायला गेला. दुपारी २ च्या सुमारास आजोबांच्या घराच्या टेरेसवरून तो पतंग उडवत होता.
टेरेसवरून गेलेल्या अतिउच्च दाबाच्या वीज वाहिनीचा करंट लागल्यामुळे देवांशू टेरेसवर पडला. त्यामुळे आजूबाजूची मुले ओरडली. ते ऐकून आजोबा धावले. त्यांनी देवांशूला एका खासगी रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याची नाजूक अवस्था बघून त्याला मेडिकलमध्ये नेण्याचा सल्ला दिला.
मेडिकलमध्ये डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे मिरे ले-आऊट आणि सद्भावना नगरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दुसरी घटना आॅरेज सिटी हॉस्पिटलजवळच्या झोपडपट्टीत बुधवारी सायंकाळी ५ वाजता घडली. राजेन पुरण पटेल (वय १८) हा चंद्रकांत सावरे यांच्या छतावर पतंग उडवत होता. विजेच्या तारांना अडकलेली पतंग काढण्याच्या प्रयत्नात राजेन पटेलला करंट लागला. त्यामुळे तो बेशुद्ध पडला. आजूबाजूच्यांनी राजेनला आॅरेंजसिटीत नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तिलक कुशवाह (वय २६) यांच्या माहितीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. (प्रतिनिधी)

Web Title: A rope of both the lives of the cats in the nets of the moth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.