मेट्रो-२ ब आणि मेट्रो-४ साठी रस्सीखेच
By admin | Published: May 14, 2017 01:33 AM2017-05-14T01:33:43+5:302017-05-14T01:33:43+5:30
मेट्रो-२ ब आणि मेट्रो-४ च्या प्रकल्पाच्या कामासाठी तब्बल दहा कंपन्यांनी उत्सुकता दाखविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून राबविण्यात येत असलेल्या मेट्रो-२ ब आणि मेट्रो-४ च्या प्रकल्पाच्या कामासाठी तब्बल दहा कंपन्यांनी उत्सुकता दाखविली आहे. सदर मेट्रोच्या कामासाठी दहा कंपन्यांमध्ये स्पर्धा आहे.
डी.एन. नगर ते मानखुर्द या मेट्रो-२ ब चे काम चार पॅकेजमध्ये विभागण्यात आले आहे. वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे- कासारवडवली या मेट्रो-४ चे काम पाच पॅकेजमध्ये विभागण्यात आले आहे. मेट्रो-२ ब चे एक पॅकेज आणि मेट्रो-४ च्या पाच पॅकेजसाठी लार्सन अॅण्ड टूब्रो तयार आहे. तर मेट्रो-२ ब एक पॅकेज आणि मेट्रो-४ च्या दोन पॅकेजसाठी अॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरने तयारी दाखवली आहे.
मेट्रो-२ च्या एका पॅकेजसाठी जेएचईसी-आरसीसी-जेव्ही (चायना) ने तयारी दाखवली आहे. तर मेट्रो-२ ब आणि मेट्रो-४ च्या प्रत्येकी दोन पॅकेजसाठी एनसीसी व जेएमसीने तयारी दाखवली आहे.
मेट्रो-२ ब च्या दोन पॅकेजसह मेट्रो-४ च्या एका पॅकेजसाठी जे. कुमार स्पर्धेत आहे.
याव्यतीरिक्त सिम्प्लेक्स, रिलायन्स, आयटीडी, सीएचइसी-टीपीएल या कंपन्याही स्पर्धेत असून, लवकरच या प्रकल्पाच्या पुढील कामासाठीचा निर्णय घेण्यात येणार आहे.
मेट्रो-२ च्या एका पॅकेजसाठी जेएचईसी-आरसीसी-जेव्हीने तर मेट्रो-२ ब आणि मेट्रो-४ च्या प्रत्येकी दोन पॅकेजसाठी एनसीसी व जेएमसीने तयारी दाखवली आहे.
मेट्रोलांबी प्रकल्प किंमत
मेट्रो-२ ब : डी. एन. नगर-२३.६ १०,९८६ कोटी
वांद्रे-मंडालेकि.मी.
मेट्रो-४ : वडाळा-घाटकोपर-३२.३१४,५४९
ठाणे-कासारवडवलीकि.मी.