परदेशी बाजारपेठेत गुलाब खातोय भाव!

By admin | Published: February 6, 2016 01:36 AM2016-02-06T01:36:32+5:302016-02-06T01:36:32+5:30

जगभरात साजऱ्या होणाऱ्या ‘व्हॅलेन्टाइन डे’ला परदेशी बाजारपेठेत मावळातील गुलाब मोठ्या प्रमाणात निर्यात होणार आहे. मावळचा गुलाब परदेशी बाजारपेठेत नेहमीप्रमाणे भाव खाणार आहे

Rose market at the market for foreigners! | परदेशी बाजारपेठेत गुलाब खातोय भाव!

परदेशी बाजारपेठेत गुलाब खातोय भाव!

Next

पवनानगर : जगभरात साजऱ्या होणाऱ्या ‘व्हॅलेन्टाइन डे’ला परदेशी बाजारपेठेत मावळातील गुलाब मोठ्या प्रमाणात निर्यात होणार आहे. मावळचा गुलाब परदेशी बाजारपेठेत नेहमीप्रमाणे भाव खाणार आहे. मावळ तालुक्यातून किमान ३० ते ३५ लाख गुलाब फुलांच्या विक्रीचे व्हॅलेन्टाइन डेला उद्दिष्ट ठेवण्यात असल्याचे फुल व्यावसायिकांनी सांगितले. या वर्षी वातावरण संमिश्र असल्याने फुलाचे भरघोस उत्पादन आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय बाजारात फुलांना चांगली मागणी आहे. मावळ तालुक्यातील ६०० एकर जागेवर फुलांचे उत्पादन केले जाते. यापैकी ५०० एकर जागेवर गुलाबाचे उत्पादन होते. वर्षभर गुलाबाला मागणी असली, तरी प्रेमाचा दिवस म्हणून संबोधल्या जाणाऱ्या व्हॅलेन्टाइन डेला देश-विदेशात गुलाब फुलाला विशेषत: लाल रंगाच्या व मोठ्या दांडीच्या फुलांना मोठी मागणी असते.
‘‘स्थानिक मार्केट यार्डांमध्ये हक्काचा गाळा मिळावा, मावळात वर्षभर फुलांचे उत्पादन होत असले, तरी व्हॅलेन्टाइन डे वगळता वर्षभर ही फुले स्थानिक बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी पाठवली जातात. मात्र पुणे, मुंबई या मार्केटयार्डामध्ये फुल विक्रीसाठी हक्काचा गाळा नसल्याने मिळेल त्या भावात विक्री करावी लागते. शासनाने कृषी उत्पादन बाजार समितीच्या माध्यमातून मार्केटयार्डात गाळा दिल्यास शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने विक्री करता येईल, असे पवना फुलउत्पादक संघाचे अध्यक्ष मुकुंद ठाकर यांनी सांगितले. पवन मावळातील १० शेतकरी सध्या पवना फुलउत्पादक संघाच्या माध्यमातून १२ एकर जागेवर फुलांचे उत्पादन घेत आहेत. येत्या दोन वर्षांत संघाच्या माध्यमातून २५ एकर जागेवर फुलउत्पादन घेण्याचा मानस असून, त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. पॉली हाऊसमुळे चांगला नफा मिळत असल्याचे ठाकर, ज्ञानेश्वर आडकर, प्रदीप ठाकर, चंद्रकांत कालेकर, पंडित शिकारी, वसंत कालेकर, दिलीप काळे, संतोष ठुले, विष्णू आडकर, मनीषा आडकर यांनी सांगितले.
वर्षभर याकरिता फुलउत्पादक शेतकरी कामांचे व फुलांचे नियोजन करीत असतो. या वर्षी पवना फुलउत्पादक संघाच्या माध्यमातून १२ एकर जागेवर फुलांचे उत्पादन घेण्यात आले असून, चार लाख फुलांची परदेशी बाजारपेठेत निर्यातीकरिता बुकिंग झाले आहे. तर स्थानिक बाजारपेठेमध्ये दीड लाख फुलांच्या विक्रीचे उद्दिष्ट असून, परदेशी बाजारपेठेमध्ये या वर्षी फुलांना सरासरी १२ ते १५ रुपये दर व स्थानिक बाजारात ५ ते १० रुपये दर फुलांच्या दांडी व रंगानुसार निश्चित झाला आहे. पवन मावळात विविध जातीची फुले विक्रीसाठी पाठविली जातात.
४पवना फुलउत्पादक संघाची व्हॅलेन्टाइन डेच्या हंगामामध्ये ५० ते ६० लाख रुपयांची उलाढाल अपेक्षित असून, मावळ तालुक्यातील शेतकरी व कंपन्यांची आर्थिक उलाढाल ४ ते ५ कोटींची असेल, असा विश्वास ठाकर यांनी व्यक्त केला. दिनांक २७ जानेवारीपासून फुलांची निर्यात सुरूझाली असून, १० फेब्रुवारीपर्यंत ती सुरू राहणार आहे. परदेशातील वातावरणाचा अप्रत्यक्ष परिणाम विक्रीवर मावळात वातावरण चांगले असल्याने फुलांचे उत्पादन समाधानकारक असले, तरी त्या देशांमध्ये ही फुले विक्रीसाठी जातात. पॉली हाऊससाठी अनुदान मिळते.
४त्या देशातील हवामानावर फुलांची मागणी निर्धार करीत असते. हॉलंड व जपान या देशांमध्ये मावळातील गुलाबांना सर्वाधिक मागणी आहे. त्यांच्या खालोखाल आॅस्ट्रेलिया, सिंगापूर, संयुक्त अरब देशात फुले निर्यात केली जातात. देशीय बाजारात मुंबई व पुणे या दोन महत्त्वाच्या बाजारपेठा असून, त्यानंतर बंगळूर, दिल्ली, नागपूर येथे फुले विक्रीसाठी पाठविली जातात. ५०० एकर जागेवर गुलाब उत्पादन मावळातील वातावरण गुलाब फुलांच्या वाढीसाठी पोषक व अनुकूल असल्यामुळे मावळात गुलाब फुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

Web Title: Rose market at the market for foreigners!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.