‘रोटरी क्लब’ने उचलला रेल्वे स्थानकांच्या स्वच्छतेचा विडा!
By admin | Published: March 12, 2016 02:23 AM2016-03-12T02:23:46+5:302016-03-12T02:23:46+5:30
भुसावळ मंडळातील १0 रेल्वे स्थानकांवर राबविणार ‘स्वच्छ भारत’ अभियान!
अकोला: रेल्वे प्रशासनाच्यावतीने देशातील सर्व रेल्वे स्थानकांवर ह्यस्वच्छ रेल - स्वच्छ भारतह्ण हे अभियान राबविले जात आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळात या अभियानाची यशस्वी अंमलबजावणी व्हावी, याकरिता रोटरी क्लबने विभागातील १0 रेल्वे स्थानकांवर हे अभियान राबविण्याचा विडा उचलला आहे. रेल्वे आणि रोटरी क्लब ३0३0 यांच्यात तीन वर्षांसाठी झालेल्या करारानुसार रोटरीच्यावतीने हे अभियान अकोल्यासह विभागातील अमरावती, बडनेरा, शेगाव, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड व नाशिक रोड रेल्वे स्थानकावर राबविले जाणार आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये कार्य करणारी रोटरी संघटना सन १९0५ मध्ये अस्तित्वात आली. संपूर्ण जगात या संघटनेचे १.३ कोटींपेक्षा अधिक सदस्य असून, देशातील ५३0 जिल्ह्यांत ३३ हजार शाखा या संघटनेने स्थापन केल्या आहेत. विविध क्षेत्रांमध्ये सामाजिक कार्य करणार्या या संघटनेची विदर्भात ह्यरोटरी क्लब ३0३0ह्ण ही शाखा कार्यरत आहे. रोटरी क्लबच्या या शाखेने भुसावळ मंडळातील १0 रेल्वे स्थानकांवर स्वच्छता अभियान राबविण्याचा विडा उचलला आहे. यासाठी तीन वर्षांचा करार २६ फेब्रुवारी २0१६ रोजी मध्य रेल्वे भुसावळ मंडळाचे विभागीय व्यवस्थापक आणि रोटरी क्लब ३0३0 चे जिल्हा राज्यपाल डॉ. निखिल किबे यांच्यात झाला. यावेळी संघटनेचे महेश मोखडकर, डॉ. के. एस. राजन व राजीव शर्मा उपस्थित होते. या अभियानाची व्याप्ती धुळे, बुलडाणा, यवतमाळ तसेच बर्हाणपूर व खंडवा या रेल्वे स्थानकांपर्यंत राहणार आहे. या अभियानाची अंमलबजावणी करीत असताना रेल्वे स्थानकांची स्वच्छता आणि सुंदरतेकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. लोकसहभाग वाढविण्यासाठी आणि सुरक्षिततेबाबत जनजागृतीही करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. निखिल किबे यांनी दिली.