रिपाइं मंत्रालयात घुसून आंदोलन करणार

By admin | Published: August 26, 2016 08:20 PM2016-08-26T20:20:02+5:302016-08-26T20:20:02+5:30

ज्य शासनाने प्रस्तावित अंतर्गत सुरक्षा कायदा रद्द केला नाही, तर मंत्रालयात घुसून आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने (खरात) दिला आहे.

In the RPI Ministry, we will go for a movement | रिपाइं मंत्रालयात घुसून आंदोलन करणार

रिपाइं मंत्रालयात घुसून आंदोलन करणार

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26 -   राज्य शासनाने प्रस्तावित अंतर्गत सुरक्षा कायदा रद्द केला नाही,
तर मंत्रालयात घुसून आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी आॅफ
इंडियाने (खरात) दिला आहे. राज्यातील दलितांवरील अन्यायांविरोधात होणारी
आंदोलने दडपण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हा डाव असल्याचा आरोपही
रिपाइंचे अध्यक्ष सचिन खरात यांनी केला आहे.
खरात म्हणाले की, हा कायदा म्हणजे हुकूमशाही आहे. राज्यभर दलितांवरील
अत्याचारांच्या घटनांत वाढ होत आहेत. त्याविरोधात दलित समाज उभा राहत
असून उत्स्फूर्त मोर्चे निघत आहेत. कोपर्डी घटनेनंतर राज्यात झालेली
आंदोलने त्याचे ताजे उदाहरण आहे. मात्र हा कायदा झाल्यास दलितांना तोंड
दाबून बुक्क्यांचा मार खावा लागेल. आंदोलन हा दलितांसह पीडितांना
लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. मात्र या कायद्याने हा हक्कही हिरावला
जाईल.
परिणामी सरकारने हा हुकूमशाही कायदा रद्द करावा, अशी मागणी रिपाइंने केली
आहे. नाहीतर याआधीप्रमाणेच मंत्रालयात घुसून प्रस्तावित कायद्याची होळी
करण्याचा इशारा रिपाइंने दिला आहे.

 

Web Title: In the RPI Ministry, we will go for a movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.