जळगावच्या विकासासाठी १०० कोटी रुपये देणार - गिरीश महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 03:50 AM2017-10-03T03:50:59+5:302017-10-03T03:51:17+5:30
शहराच्या विकासासाठी राज्य शासनाकडून १०० कोटींचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा जलसपंदा मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी केली.
जळगाव : शहराच्या विकासासाठी राज्य शासनाकडून १०० कोटींचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा जलसपंदा मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हा निधी देण्यास सहमती दर्शविली आहे, असेही ते म्हणाले.
जैन उद्योग समुहाचे संस्थापक भवरलाल जैन यांचे स्वप्न असलेल्या जल विद्यापीठाचे (वॉटर युनिर्व्हसिटी) लवकरच भूमिपूजन करण्यात येईल, अशी माहिती जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी दिली. जैन उद्योग समुहाच्या माध्यमातून गांधी उद्यानाची पुनर्बांधणी व नूतनीकरण करण्यात आले आहे.
महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. माजी मंत्री सुरेशदादा जैन,
महापौर ललित कोल्हे, महात्मा
गांधी यांच्या नातसून सोनल गांधी, संघपती दलुभाऊ जैन आदी
उपस्थित होते.
रुग्णांची तपासणी
यावल (जि. जळगाव) : पंडीत दीनदयाल उपाध्याय जयंती वर्षाचा समारोप आणि महात्मा गांधी जयंती निमित्त फैजपूर येथे सोमवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून महाआरोग्य शिबिर झाले. जवळपास दीड लाख रुग्णांची तपासणी करण्यात आली.