पुरस्काराच्या रकमेत १५ लाखांची भर घालत बाबासाहेबांची कर्करोगग्रस्तांना २५ लाखांची मदत

By admin | Published: August 19, 2015 07:02 PM2015-08-19T19:02:52+5:302015-08-19T19:31:10+5:30

ज्या ज्या लोकांनी आपल्या कलेच्या माध्यमातून इतिहास ललित स्वरुपात लोकांपर्यंत पोचवला ते सगळे जण महाराष्ट्र भूषण असल्याचे महाराष्ट्र भूषण पुरंदरे म्हणाले.

Rs. 15 lakhs for the contribution of Rs. 15 lakhs to the cancer victims of Babasaheb's cancer. | पुरस्काराच्या रकमेत १५ लाखांची भर घालत बाबासाहेबांची कर्करोगग्रस्तांना २५ लाखांची मदत

पुरस्काराच्या रकमेत १५ लाखांची भर घालत बाबासाहेबांची कर्करोगग्रस्तांना २५ लाखांची मदत

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - महाराष्ट्र भूषण पुरस्काराने माझ्यावर जबाबदारी वाढल्याचं सांगणा-या बाबासाहेब पुरंदरे यांनी पुरस्काराच्या १० लाखांच्या रकमेत १५ लाखांची भर टाकत कर्करोग ग्रस्तांसाठी २५ लाख रुपयांची देणगी देण्याचे पुरस्कार स्वीकारताना जाहीर केले.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना 'महाराष्ट्र भूषण' हा महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आज संध्याकाळी राजभवनात आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात  प्रदान करण्यात आला. राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. राजभवनातील दरबार सोहळ्यात संपन्न झालेल्या या सोहळ्याला निवडक २५० लोकांनाच आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी बाबासाहेव पुरंदरेंनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की ज्या - ज्या लोकांनी आपल्या कलेच्या माध्यमातून इतिहास ललित स्वरुपात लोकांपर्यंत पोचवला ते सगळे जण महाराष्ट्र भूषण आहेत. 
 
बाबासाहेबांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे:
- इतिहास हे मौलिक धन आहे. तिचा आदर व्हायला, अपमान होता कामा नये. इतिहास सांगण्यासाठी कलाकार हवेत, नाटककार हवेत, कवी आहेत...
- आता तेलाच्या दिव्यातलं तेल संपलंय फक्त वात जळतंय अस सांगत आपल्या ९४ या वयाचा उल्लेख बाबासाहेब पुरंदरेंनी भावनात्मक होत केला.
- कलाकारांनी कधीही अहंकार मनी धरू नये. अहंकाररहीत जे कार्य करतात तेच खरे.
- हा पुरस्कार देऊन मला प्रचंड मोठी जबाबदारी दिली आहेत. हा मला पेलेल का अशी माजी भावना आहे. मी गरीब आहे, साधा आहे.
- इतिहास ललित लेखनातून मांडतानाही प्रचंड अभ्यास केला पाहिजे, कुठलीही चूक होता कामा नये. त्यातून काही चूक झाली तर दुरूस्त करायची तयारी हवी आणि मी व्रत म्हणून हे स्वीकारलं.
- टिळकांचा गीतारहस्य ग्रंथ किती जणांनी वाचलाय पण लोकांना कळणारी गीताई जास्त वाचली गेलीय. टिळकांचं कार्य थोरच पण विनोबांची गीताई घराघरात पोचली. म्हणून मीपण सोप्या भाषेत व या शैलीत शिवचरीत्र लिहिलं .
- शिवाजी महाराजांच्या कालखंडातली पाच लाख कागदपत्रे राजस्थानमध्ये बिकानेर येथील संग्रहालयात आहे. कुणीतरी अभ्यास करायला हवा. म्हणून इतिहास संशोधक महामंडळाच्या माध्यमातून एक खंड लिहिला. 
- लोकांना ही शैली आवडली, त्यांनी माझं शिवचरीत्र, लेखन स्वीकारलं.
- ज्ञानेश्वरीच मार्ग सापडला. भगवत गीतेचे तत्वज्ञान सगळ्यांपर्यंत पोचवायचं असेल तर सोप्या मराठीत ज्ञानोबांनी पोचवलं. आणि मला मार्ग सापडला. लोकांपर्यंत पोचावं म्हणून अशा शैलीत मी शिवचरीत्र लिहिलं.
-  महाराष्ट्रात विविध ठिकाणी गेलो. ९ भाषा येणारा व २५ पुस्तकं लिहिणारा ग. ह. खरेंसारखा श्रेष्ठ गुरू लाभला. लोकांना समजणार नसेल, पोचणार नसेल, खेड्यापाड्यात जाणार नसेल तर काय उपयोग.. म्हणून सहा महिने मी विचार करत होतो.
- सुरुवातीच्या काळात मी नऊ लेख लिहिले आणि एका  मासिकात छापायला दिले. त्यानंतर ते छापूनही आले, मात्र ती त्या छापून आलेल्या लेखांविषयी कोणी अभिप्राय पाठवितो काय, याची वाट पाहत होतो, पण एकही प्रतिसाद आला नाही. त्यावेळी मी खूप बेचैन झालो होतो.  
- चर्चा, चिकित्सा, भाष्य, मूल्यमापन या सगळ्या गोष्टी मी इतिहासाच्या बाबतीत केल्या. ते सगळे नऊ लेख एका अंकात छापून आले. पण एकही प्रतिसाद आला नाही.
--------------------------------
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा हा कोणाची भीती वाटल्यामुळे राजभवनात आयोजित केला नाही. छत्रपतींच्या खऱ्या सेवकांना कोणाची भीती वाटणे शक्य नाही. देशातील महत्त्वपूर्ण पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्र भूषण हा राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार राज्यपाल यांच्या हस्ते राजभवनात प्रदान करावा म्हणूम आम्ही हा पुरस्कार सोहळा राजभवनात आयोजित केला आहे. वाद करणा-या लोकांना छत्रपती समजलेच नाहीत, त्यांच्या नावाने जातिभेद ते करतात. आज छत्रपती असते तर त्यांनी या वाद घालणा-यांचा कडेलोट केला असता.  बाबासाहेबांनी मुलामुलांध्ये राष्ट्रप्रेमाचे बीजारोपण केले. शाळेतली मुलं जाणता राजा बघतात, त्यावेळी वेगळी राष्ट्रभक्ती शिकवण्याची गरज राहत नाही.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस 
--------------------------------------
मलाही शिवाजी महाराजांबद्दलची बरीच माहिती बाबासाहेबांच्या व्याख्यानातून आणि पुस्तकातूनच मिळाली. मात्र, आता त्यांच्याबद्दल ज्याप्रकारचे आक्षेप घेतले जात आहेत, ते अर्धा टक्काही खरे नाहीत हे शिवचरित्र वाचल्यावर कळेल. तावडेंसारखा मराठा फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी पुरंदरेंना पुरस्कार देतो असं कोण का पसरवतंय हा शोधाचा विषय आहे... हे कोण का करतंय हेच कळत नाही. मी मराठा आहे म्हणून पुरंदरेंवर प्रेम करायचं नाही का? छत्रपती शिवरायांच्या प्रेमापोटीच आम्ही अनेक निर्णय घेत आहोत आणि जनता सजग आहे. बाबासाहेबांना हा पुरस्कार माझ्या अध्यक्षतेखालील समितीने दिला ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. न्यायालयाच्या आजच्या निर्णयानेही बाबासाहेबांच्या ५० वर्षांच्या कार्याला पोचपावती दिली आहे.
- सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे 
 

Web Title: Rs. 15 lakhs for the contribution of Rs. 15 lakhs to the cancer victims of Babasaheb's cancer.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.