बंद टोल नाक्यांमुळे ७९९ कोटींचा तोटा

By admin | Published: March 13, 2016 04:45 AM2016-03-13T04:45:42+5:302016-03-13T04:45:42+5:30

राज्य सरकारने राज्यभरातील विविध ठिकाणांचे १२ टोल नाके बंद व ५३ नाक्यांवर सूट दिल्यामुळे, राज्य सरकारला त्या बदल्यात संबंधित उद्योजक व कंत्राटदार कंपनीला तब्बल ७९८.४४ कोटी रुपयांचा

Rs. 999 crore loss due to closed toll nos | बंद टोल नाक्यांमुळे ७९९ कोटींचा तोटा

बंद टोल नाक्यांमुळे ७९९ कोटींचा तोटा

Next

मुंबई : राज्य सरकारने राज्यभरातील विविध ठिकाणांचे १२ टोल नाके बंद व ५३ नाक्यांवर सूट दिल्यामुळे, राज्य सरकारला त्या बदल्यात संबंधित उद्योजक व कंत्राटदार कंपनीला तब्बल ७९८.४४ कोटी रुपयांचा परतावा व नुकसान भरपाई द्यावी लागली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मिळविलेल्या माहितीतून ही बाब उघडकीस आली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील ११ टोल बंद केल्यामुळे २२६.५१ कोटी रुपये परताव्याची रक्कम झाली आहे. राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडील १ नाका बंद करण्यात आला असून, त्यावर १६८ कोटी परतावा रक्कम संबंधित कंपनीला देण्यात आली आहे. उर्वरित १९ प्रकल्पांवरील २७ टोल नाक्यांवर कार, जीप, तसेच एसटी आणि स्कूल बसेसना टोल टॅक्समध्ये सूट दिल्यामुळे संबंधितांना भरपाई रक्कम १७९.६९ कोटी दिली आहे, तर रस्तेविकास महामंडळाकडील १२ प्रकल्पांवरील २६ टोल नाक्यांवर टोल टॅक्समध्ये सूट दिल्यामुळे २२४.२४ कोटी भरपाई द्यावी लागली. (प्रतिनिधी)

Web Title: Rs. 999 crore loss due to closed toll nos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.