मैत्रेयच्या १२५ ठेवीदारांना १७ लाख रुपये परतावा

By admin | Published: July 29, 2016 10:15 PM2016-07-29T22:15:13+5:302016-07-29T22:15:13+5:30

राज्यातील गुंतवणूकदारांचे लक्ष लागलेल्या मैत्रेय कंपनीच्या १२५ ठेवीदारांना शुक्र वारी १७ लाख १४ हजार ३९७ रुपये डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून परत करण्यात आले

Rs.17 lakh refund to 125 depositors of Maitreya | मैत्रेयच्या १२५ ठेवीदारांना १७ लाख रुपये परतावा

मैत्रेयच्या १२५ ठेवीदारांना १७ लाख रुपये परतावा

Next

ऑनलाइन  लोकमत
नाशिक, दि २९ : राज्यातील गुंतवणूकदारांचे लक्ष लागलेल्या मैत्रेय कंपनीच्या १२५ ठेवीदारांना शुक्र वारी १७ लाख १४ हजार ३९७ रुपये डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून परत करण्यात आले. या प्रकरणात गुंतवणूकदारांनी गुंतविलेली रक्कम त्यांना व्याजासह परत मिळणार असून, देशातील विविध आर्थिक गुन्हे प्रकरणात अशाप्रकारे एवढ्या कमी कालावधित पहिल्यांदाच ठेवीदारांना व्याजासह परतावा मिळणार असल्याचे पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी सांगितले.

गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक केल्याच्या प्रकरणात पोलिसांकडे आतापर्यंत १४ हजारांहून अधिक तक्र ारी प्राप्त झाल्या आहेत. यातील नाशिकच्या १२५ ठेवीदारांना १७ लाख १४ हजार ३९७ रुपयांचा परतावा देण्यात आला. न्यायालयाने मान्यता दिल्यामुळे गुंतवणूकदारांना पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यातील प्रथम टप्प्याचे वाटप शुक्रवारी पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या हस्ते रावसाहेब थोरात सभागृहात करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार राजश्री अहिरराव, सरकारी वकील अजय मिसर, लेखा परीक्षक अमित शर्मा, उपायुक्त विजय पाटील, लक्ष्मीकांत पाटील, श्रीकांत धिवरे आदि उपस्थित होते. मैत्रेय कंपनीचे इस्क्र ो खात्यात सहा कोटी ३५ लाख रु पये आहेत.

कंपनीच्या देशभरात तब्बल एक ते दीड हजार कोटींची मालमत्ता असून, त्यांच्या जप्तीची प्रक्रि याही सुरू आहे. ठेवीदारांच्या रकमेचा परतावा देण्यासाठी समितीने ज्या ठेवीदारांचा परतावा कमी रकमेचा आहे, त्यांना सुरुवातीला रक्कम देण्यास सांगितले आहे. शहरातील ठेवीदारांच्या परताव्यानंतर इतर जिल्ह्यातील ठेवीदारांना इस्क्रो खात्यातून परतावा देण्याचे न्यायालयाने सूचित केले आहे. विशेष न्यायालयाच्या आदेशानुसार समितीने मुदत संपलेल्या व कमी देय रकमेचा परतावा असलेल्या ठेवीदारांची यादी तयार केली.

यातील १२५ ठेवीदारांची यादी समितीने मंजूर करीत संबंधितांना या रकमेचे डिमांड ड्राफ्टचे वाटप करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणात यश प्राप्त करणाऱ्या तपास समितीला व पोलीस आयुक्तांना मिळालेल्या बढतीसाठी अभिनंदन करणारे मुख्यमंत्री कार्यालयाचे व पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयाचे पत्र यावेळी वाचून दाखविण्यात आले. 

परतावा मिळाल्याने आनंद
कष्टाचे पैसे बुडणार की काय असा प्रश्न मैत्रेयच्या गुंतवणूकदारांना सतावत होता. यातील नीलिमा अग्निहोत्री (८११०), कल्पना चव्हाण (९४६८), शफीक सय्यद (२२२५०) आशिष वाणी, भरत जाधव (११५५) कचरू शेंडे, मुरलीधर गांगुर्डे, असिफ शेख, अर्चना खैरनार, सुनीता भगत, विठाबाई बकूळ, सविता यादव आदिंसह १२५ ठेवीदारांना शुक्रवारी प्रथम टप्प्यात १७ लाख १४ हजार ३९७ रुपयांचा परतावा देण्यात आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. उर्वरित ठेवीदारांनाही पैसे मिळणार असल्याचा विश्वास निर्माण झाला आहे.

Web Title: Rs.17 lakh refund to 125 depositors of Maitreya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.