देशात झालेल्या बॉम्बस्फोटांमागे संघाचा हात, न्या. कोळसे-पाटील यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 09:51 AM2020-01-30T09:51:10+5:302020-01-30T09:53:25+5:30

माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

The RSS is behind the bombings in the country, B. G. Kolse-Patil's serious allegation | देशात झालेल्या बॉम्बस्फोटांमागे संघाचा हात, न्या. कोळसे-पाटील यांचा गंभीर आरोप

देशात झालेल्या बॉम्बस्फोटांमागे संघाचा हात, न्या. कोळसे-पाटील यांचा गंभीर आरोप

googlenewsNext

बीड  - माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देशात आतापर्यंत घडलेल्या सर्व बॉम्बस्फोटांमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचा आरोप कोळसे-पाटील यांनी केला आहे. त्याबरोबरच नरेंद्र मोदी आणि अमिह शाह हे खुनी असून, त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत, असा दावाही त्यांनी केला आहे. 

काल बीडमध्ये झालेल्या संविधान बचाओ संघर्ष समितीच्या महासभेला उपस्थित असलेल्या बी.जी. कोळसे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी व्यासपीठावर मौलाना अबु तालीब रहमानी, माजी. न्या. बी. जी कोळसे पाटील, तिस्ता सेटलवाड, दीपसिता धार, आ. संदीप क्षीरसागर, माजी आ. राजेंद्र जगताप, अमरसिंह पंडित, सय्यद सलीम, उषा दराडे, सिराज देशमुख, प्रा. सुनील धांडे आदी उपस्थित होते. 

 कोळसे पाटील म्हणाले की, ''आरएसएस ही देशाची शत्रू असून, नरेंद्र मोदी आणि अमिक शाह दलाल आहेत. साडेपाच वर्षांत रोजगार संपला, बँका बुडाल्या, सामान्यांसाठीचे कायदे बासनात गुंडाळले. न्यायव्यवस्था, नोकरशाही धोक्यात आली आहे. सीएए, एनआरसी कायद्याविरोधात संघटितपणे लढा देण्याची गरज आहे.'' 

यावेळी कोळसे-पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर गंभीर आरोप केला. देशात आतापर्यंत झालेल्या बॉम्बस्फोटांमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात होता, तसेच यासंदर्भातील पुरावे  मी शरद पवाय यांच्याकडे दिला आहेत, असेही ते म्हणाले तसेच नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे खुनी असल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत, असा दावाही त्यांनी केला.  

Web Title: The RSS is behind the bombings in the country, B. G. Kolse-Patil's serious allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.