RSS चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतली कोरोना लस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2021 11:51 AM2021-03-07T11:51:23+5:302021-03-07T11:53:45+5:30

Corona Vaccination: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत आणि महासचिव सुरेश भैय्याजी जोशी यांनी कोरोना लस घेतली.

rss chief mohan bhagwat and suresh bhaiyyaji joshi received their first dose of corona vaccine | RSS चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतली कोरोना लस

RSS चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतली कोरोना लस

Next
ठळक मुद्देमोहन भागवत यांनी घेतली कोरोना लससुरेश भैय्याची जोशी यांनीही घेतला कोरोना लसीचा पहिला डोसनागपूर येथील कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये कोरोना लसीकरणाची सोय

नागपूर : देशात सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिल्यानंतर देशव्यापी कोरोना लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला. ०१ मार्चपासून देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, नेते, मंत्री यांनी कोरोना लस घेतली आहे. यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह सुरेश ऊर्फ भय्याजी जोशी यांनी कोरोना लस घेतली. (rss chief mohan bhagwat and suresh bhaiyyaji joshi received their first dose of corona vaccine)

नागपूर येथील कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये मोहन भागवत आणि सुरेश ऊर्फ भय्याजी जोशी यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. यापूर्वी ०१ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लस घेतली होती. यावेळी देशवासीयांनी कोरोना लस घ्यावी, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले होते. 

राज्यातील काेराेनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत २२ टक्क्यांनी वाढ

पंतप्रधान मोदींचा फोटो हटवण्याचे निर्देश

केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोरोना लस सर्टिफिकेटवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवावा, असे निर्देश निवडणूक आयोगाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दिले आहेत. कोरोना लस प्रमाणपत्रावरील मोदींच्या फोटोला विरोधकांकडून आक्षेप घेण्यात आला होता.

कोरोनाची स्थिती चिंताजनक

मागील काही दिवसांपासून राज्यासह मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे; परिणामी, दैनंदिन रुग्णसंख्येत २२ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली. मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी अकराशेहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली. कोरोना नियंत्रणासाठी गौरविलेल्या धारावीमध्येही पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या ३ लाख ३१ हजार १६ वर गेली आहे. तर सध्या मुंबईत १०,४६९ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील काेरोनाबाधितांची संख्या २२,०८,५८६ झाली असून, बळींचा आकडा ५२,४४० झाला आहे. दिवसभरात ६,०८० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून एकूण २०,६२,०३१ रुग्ण काेराेनामुक्त झाले. राज्यात शनिवारी १०,१८७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, ४७ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

Web Title: rss chief mohan bhagwat and suresh bhaiyyaji joshi received their first dose of corona vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.