Maharashtra Politics: “एखादी व्यक्ती नाही, तर भगवा ध्वजच आमच्यासाठी आदर्श”; मोहन भागवत स्पष्ट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 10:08 AM2023-01-13T10:08:37+5:302023-01-13T10:09:35+5:30

Maharashtra News: आपल्याला भारत विश्वगुरू बनवायचा आहे. जगाला भारताची गरज आहे, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

rss chief mohan bhagwat said our ideal is saffron flag not any person | Maharashtra Politics: “एखादी व्यक्ती नाही, तर भगवा ध्वजच आमच्यासाठी आदर्श”; मोहन भागवत स्पष्ट बोलले

Maharashtra Politics: “एखादी व्यक्ती नाही, तर भगवा ध्वजच आमच्यासाठी आदर्श”; मोहन भागवत स्पष्ट बोलले

Next

Maharashtra Politics:राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कोणतीही व्यक्ती आपल्यासमोर आदर्श नाही. भगवा ध्वज आपल्यासमोर आदर्श आहे. आपल्या समोर तत्त्व आहेत आणि तत्त्वांमध्ये जर काही चिन्ह असेल तर तो भगवा ध्वज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. एका कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. 

पुढे बोलताना मोहन भागवत म्हणाले की, रामभक्त हनुमान हे आमचे आदर्श आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज आमचे आदर्श आहेत. आपल्याला भारत विश्वगुरू बनवायचा आहे. संपूर्ण जगाला या देशाची गरज आहे. आपले जीवन देशासाठी आहे. आपण जे काही कमावू, त्याचा देशासाठी त्याग करायला हवा. नव्या पिढीची आपण सर्वांनीच काळजी घ्यायला हवी, असे मोहन भागवत यांनी नमूद केले. आपण आपल्या विचारांवर ठाम असले पाहिजे, आपल्या कर्मावर आपण भर दिला पाहिजे, असेही मोहन भागवत म्हणाले. 

धर्माची व्याप्ती खूप मोठी आहे

सनातन धर्म हे एकमेव हिंदू राष्ट्र आहे. जेव्हा जेव्हा हिंदू राष्ट्राची प्रगती होते, तेव्हा ती धर्माच्या प्रगतीसाठी असते. आता सनातन धर्माची उन्नती व्हायला हवी. भारत नेहमीच अमर आणि अपराजित राहिला आहे. धर्म हे या देशाचे सत्व आणि सार आहे. धर्माची व्याप्ती खूप मोठी आहे, त्याशिवाय जीवन चालू शकत नाही, असे मोहन भागवत म्हणाले. 

धर्म म्हणजे केवळ पूजा पद्धती, पंथ, संप्रदाय नाही

धर्म म्हणजे केवळ पूजा पद्धती, पंथ, संप्रदाय नाही. तर धर्म हा मूल्य, सत्य, करुणा, शुद्धता आणि तपस्या यांप्रमाणे अतिशय महत्त्वाचा आहे. स्वातंत्र्य मिळवण्यापूर्वी शेकडो वर्षांपासून अनेक आक्रमणे सोसूनही भारत जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक आहे. कारण तेथील लोकांनी धर्म सत्व जपले आहे, असे मोहन भागवत यांनी सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: rss chief mohan bhagwat said our ideal is saffron flag not any person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.