आरएसएसचे प्रचारक मधुकर लिमये यांचे निधन

By admin | Published: November 4, 2015 05:54 PM2015-11-04T17:54:41+5:302015-11-04T17:59:25+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मधुजी लिमये यांचे बुधवारी वृद्धपकाळाने निधन झाले.

RSS preacher Madhukar Limaye passes away | आरएसएसचे प्रचारक मधुकर लिमये यांचे निधन

आरएसएसचे प्रचारक मधुकर लिमये यांचे निधन

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मधुजी लिमये यांचे आज वृद्धपकाळाने निधन झाले आहे. लिमये यांच्यावर संध्याकाळी सात वाजता दादर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मधुकर लिमये गेली ६० वर्षे आसाममध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून कार्यरत होते. लिमये आसाममध्ये "मधुजी कोका' म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजीसह आसामी व बंगाली भाषेवरही प्रभुत्व मिळवले. त्यांच्या प्रयत्नामुळे "अमर चित्रकथे'सारखी अनेक पुस्तके ईशान्य भारतातील आदिवासी भाषांमध्ये भाषांतरित झाली.
२०१२ मध्ये ईशान्य भारतातील लोकांसाठी कार्यरत असलेल्या "माय होम इंडिया' या संस्थेतर्फे देण्यात येणारा वार्षिक पुरस्कार 'वन इंडिया अॅवॉर्ड'ने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. 

Web Title: RSS preacher Madhukar Limaye passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.