आरएसएस दहशतवादी संघटना

By admin | Published: October 5, 2015 01:13 AM2015-10-05T01:13:46+5:302015-10-05T01:13:46+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ही देशातील सर्वांत मोठी दहशतवादी संघटना असून, स्वातंत्र्यलढ्याला विरोध करण्यासाठी आणि अराजक माजविण्यासाठी या संघटनेची स्थापना झाली होती.

RSS terrorist organization | आरएसएस दहशतवादी संघटना

आरएसएस दहशतवादी संघटना

Next

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ही देशातील सर्वांत मोठी दहशतवादी संघटना असून, स्वातंत्र्यलढ्याला विरोध करण्यासाठी आणि अराजक माजविण्यासाठी या संघटनेची स्थापना झाली होती. त्यामुळे आरएसएसमुक्त भारत झाल्याशिवाय ‘अच्छे दिन’ येणार नाहीत, असा आरोप माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी रविवारी केला. तसेच देशाला मनुवादी विचारांच्या विळख्यातून सोडविण्यासाठी दलित, आदिवासी, मुस्लिम यांनी एकत्रित येण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपा, शिवसेना या राजकीय पक्षांना पर्यायी व्यवस्था म्हणून पुरोगामी विचारसरणीच्या संस्था, संघटना व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन देश बचाव आघाडी स्थापन केली असून, या आघाडीच्या वतीने शनिवारवाड्यावर जाहीर सभा घेण्यात आली़ या प्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत, निवृत्त पोलीस अधिकारी एस. एम. मुश्रीफ, आमदार जितेंद्र आव्हाड, समाजवादी नेते सुभाष वारे, प्रतिमा परदेशी, श्रीमंत कोकाटे, राहुल पोकळे, मुकुंद काकडे, मौलाना अब्दुल महीद अझरी, मारुती भापकर, राजेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते. केंद्र व राज्य शासन घटनेतील मूलतत्त्वे पायदळी तुडवत आहे. त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही. घटनेत बदल करता येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी घटना बाजूला सारून देशात हुकूमशाही आणण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू केला आहे, असे नमूद करून पी. बी. सावंत म्हणाले, की राज्यातील फडणवीस सरकार बेकायदेशीरपणे स्थापन झालेले आहे. आव्हाड यांनी मोदींच्या वागणुकीतून हिटलर दिसून येत असल्याचा आरोप केला.

Web Title: RSS terrorist organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.