महाराष्ट्रात भाजपसाठी RSS प्रचार करणार नाही
By admin | Published: October 6, 2014 11:40 AM2014-10-06T11:40:45+5:302014-10-06T11:49:13+5:30
नरेंद्र मोदींच्या विजयात मोलाचे योगदान देणा-या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी प्रचार करण्याचे नकार दिल्याचे वृत्त आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - नरेंद्र मोदींच्या विजयात मोलाचे योगदान देणा-या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी प्रचार करण्याचे नकार दिल्याचे वृत्त आहे. भाजपने निवडणुकीची जबाबदारी स्वीकारुन स्वतःच प्रचार करावा असे संघनेत्यांनी भाजपला सांगितले आहे.
विजयादशमीला सरसंघचालक मोहन भागवत यांनी निवडणुकीविषयी भाष्य करणे टाळले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत संघ भाजपसाठी मैदानात उतरणार की नाही याविषयी चर्चा रंगली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संघाने भाजपसाठी प्रचार करणार नाही अशी भूमिका घेतली आहे. संघाने प्रत्येक निवडणुकीत सहभाग घेतलेला नाही. मात्र लोकसभा निवडणुकीत संघ भाजपसाठी मैदानात उतरला होता. लोकसभेत भाजपला मिळालेल्या यशात संघाचे मोलाचे योगदान होते असे जाणकार सांगतात. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत संघाने ही भूमिका का घेतली याविषयी संघाच्या माजी प्रचारकाला विचारले असता ते म्हणाले, महाराष्ट्रातील भाजप युनिटकडे स्वतःची सक्षम अशी पक्षरचना आहे. त्यामुळे भाजपने स्वतः निवडणुकीची जबाबदारी स्वीकारुन काम करावे.