कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर स्वयंसेवकांना प्रशिक्षण देणार RSS; अडीच लाख ठिकाणी करणार जनजागृती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 07:18 PM2021-07-11T19:18:52+5:302021-07-11T19:19:42+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं (RSS) देखील संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी देशव्यापी 'कार्यकर्ता प्रशिक्षण' शिबिराचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव हळूहळू कमी होत आहे. तरीही केंद्र आणि राज्यांची सरकारनं कोरोना प्रादुर्भावाच्या संभाव्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काळजी घेत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवलेली असल्याचनं त्यासाठीची पूर्वतयारी देखील सरकारनं सुरू केली आहे. यात आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं (RSS) देखील संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी देशव्यापी 'कार्यकर्ता प्रशिक्षण' शिबिराचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. यात प्रशिक्षण घेतलेले स्वयंसेवक देशातील एकूण अडीच लाख जागांवर पोहोचून कोरोना संबंधिची जनजागृती करण्याचं काम करणार आहेत. स्वयंसेवक संघाच्या एकूण २७ हजार १६६ शाखा पुन्हा एकदा मैदानात उतरुन नागरिकांची सेवा करणार असल्याचं स्वयंसेवक संघाकडून सांगण्यात आलं आहे. (RSS will train volunteers about the possible third wave of Corona, will make people aware by visiting 2.5 lakh places)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीत संघटनात्मक कामांबाबत चर्चा झाली. यासोबतच कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर व्यापक रुपात चर्चा केली गेली. याशिवाय संघाच्या माध्यमातून विविध ठिकाणी केल्या गेल्या कामांचा आढवा बैठकीत घेण्यात आला. स्वयंसेवकांच्या पुढाकारातून कोरोना लसीकरण केंद्रांचीही माहिती यावेळी घेण्यात आली.
कोरोना प्रादुर्भावाच्या संभाव्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता संपूर्ण देशात सरकार आणि प्रशासनाची मदत करण्यासाठी तसंच पीडित नागरिकांना मदत करण्यासाठी स्वयंसेवक संघातील सेवकांना विशेष प्रशिक्षण दिलं जाणार आहे. कोरोनासारख्या कठीण काळात समाजाचं मनोबल वाढविण्यासाठी आवश्यक असणारी सर्व सुयोग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशिक्षित स्वयंसेवक देशभरात एकूण अडीच लाख ठिकाणांवर पोहोचणार आहेत. स्वयंसेवकांचं प्रशिक्षण ऑगस्ट महिन्यापर्यंत पूर्ण होणार आहे आणि सप्टेंबर महिन्यापासून जनजागृती मोहिमेला सुरुवात होार आहे. यात प्रत्येक गाव आणि नाक्या नाक्यावर जाऊन स्वयंसेवी नागरिक व संस्थांना देखील सोबत घेतलं जाणार आहे.