मोटारचालकांच्या हौसेने आरटीओची चांदी

By Admin | Published: September 20, 2016 01:27 AM2016-09-20T01:27:01+5:302016-09-20T01:27:01+5:30

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील नवीन वाहन क्रमांकाच्या मालिकांमधील पसंतीच्या क्रमांकासाठी हौशी वाहनमालक महिन्याला पावणेदोन कोटींची रक्कम मोजत आहेत.

RTO silver by the motors of motorcycles | मोटारचालकांच्या हौसेने आरटीओची चांदी

मोटारचालकांच्या हौसेने आरटीओची चांदी

googlenewsNext


पुणे : हौसेला मोल नसते’ या उक्तीची प्रचिती देत पसंतीच्या क्रमांकासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील नवीन वाहन क्रमांकाच्या मालिकांमधील पसंतीच्या क्रमांकासाठी हौशी वाहनमालक महिन्याला पावणेदोन कोटींची रक्कम मोजत आहेत. गेल्या चार महिन्यांत आरटीओ कार्यालयास पसंती क्रमांकामधून तब्बल ६ कोटी ७० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यात दोन वाहनचालकांनी प्रत्येकी चार लाख रुपये देऊन, तर तब्बल १५ वाहनचालकांनी प्रत्येकी तीन लाख रुपये देऊन पसंतीचे वाहन क्रमांक खरेदी केले आहेत.
परिवहन आयुक्तालयाने पसंतीच्या क्रमांकासाठी असलेली लक्षणीय मागणी लक्षात घेऊन सर्वांत जास्त मागणी असलेले क्रमांक शुल्क आकारून देण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, एका क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त मागणी आल्यास लिलाव पद्धतीने हा क्रमांक दिला जातो. त्यानुसार, लिलावात जो अधिक रक्कम देईल, त्यांना तो क्रमांक दिला जातो. आरटीओच्या पुणे विभागात पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, बारामती , अकलूज यांचा समावेश होतो. एप्रिल २0१६ ते जुलै २0१६ दरम्यान ७१८९ पसंती क्रमांकाच्या माध्यमातून आरटीओला ६,७0,९५,८१0 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. (प्रतिनिधी)
>१ नंबरसाठी चार लाख रुपये
चॉईस नंबर दोन हजार ते चार लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. नागरिक चार लाख रुपये मोजून कारसाठी १ नंबर घेत आहेत. दोघा वाहनमालकांनी १ नंबर खरेदी केला आहे. यातून आरटीओला अठरा लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये बारामतीमधील एकाच वाहनमालकाचा समावेश आहे. तीन लाख मोजून २१ जणांनी पसंती क्रमांक खरेदी केला आहे. त्यामधील १६ वाहनमालक पुणे शहरातील असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

Web Title: RTO silver by the motors of motorcycles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.