शिंदे, फडणवीस अपघातस्थळी ज्या गाडीने जाणार होते...; आरटीओने अनफिट केली, टायरची तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 11:31 AM2023-07-01T11:31:07+5:302023-07-01T11:32:15+5:30
Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावरून जाणार असल्याने पोलिसांनी शिंदे, फडणवीस जाणार असलेल्या दोन्ही गाड्यांची तपासणी केली.
महाराष्ट्राला जोडणाऱ्या महत्वाकांक्षी समृद्धी महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात झाला. नागपूरहून पुण्याला निघालेली बसने अपघातानंतर पेट घेतला आणि त्यात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या अपघातस्थळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मुंबईहून निघाले आहेत. त्यांची एक गाडी पोलिसांनी अनफिट ठरवत बदलल्याचे समोर आले आहे.
समृद्धी महामार्गावरून जाणार असल्याने पोलिसांनी शिंदे, फडणवीस जाणार असलेल्या दोन्ही गाड्यांची तपासणी केली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस मुंबईहून छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले आहेत. तिथून त्यांना अपघातस्थळी नेण्यासाठी आमदार लोगो असलेल्या दोन एसयुव्ही तयार ठेवण्यात आल्या होत्या. खबरदारी म्हणून आरटीओने या दोन्ही गाड्यांची तपासणी केली.
Buldhana bus accident : In total there were 33 passengers out of which 25 have lost their life, 3 seriously injured and 5 have minor injuries. https://t.co/VmMGcIRXsh">pic.twitter.com/VmMGcIRXsh
— Preeti Sompura (@sompura_preeti) https://twitter.com/sompura_preeti/status/1674992326731759616?ref_src=t…">July 1, 2023
दोन्ही गाड्यांच्या टायरची तपासणी करण्यात आली, तसेच हेडलाईट, सीटबेल्ट, गाडी किती किमी चालली आहे, टायर कधी बदलले आहेत, सर्व्हिसिंग कधी केलेली आहे, ब्रेक नीट लागतायत का याची तपासणी करण्यात आली. यामध्ये एक गाडी अनफिट ठरविण्यात आली. ही कार जास्त किमी चालल्याने शिंदे, फडणवीस या गाडीतून जाऊ शकत नाहीत, असा रिपोर्ट आरटीओ अधिकाऱ्यांनी दिला. यामुळे या कारच्या जागी दुसरी कार आणण्यात आली आहे. ती फिट असल्याने दोन कारमधून शिंदे, फडणवीस यांच्यासह सोबत आलेले अधिकारी अपघातस्थळी जाणार आहेत.