आरटीओ होणार दलालमुक्त!

By admin | Published: January 16, 2015 06:14 AM2015-01-16T06:14:53+5:302015-01-16T06:14:53+5:30

राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांना दलालांनी वेढा घातल्याने कामकाजाचे तीनतेराच वाजले आहेत. त्यामुळे आरटीओ कायमस्वरूपी दलालमुक्त करण्यासाठी आता परिवहन

RTO will be free! | आरटीओ होणार दलालमुक्त!

आरटीओ होणार दलालमुक्त!

Next

मुंबई : राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांना दलालांनी वेढा घातल्याने कामकाजाचे तीनतेराच वाजले आहेत. त्यामुळे आरटीओ कायमस्वरूपी दलालमुक्त करण्यासाठी आता परिवहन आयुक्त महेश झगडे यांनीच थेट लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. १७ जानेवारीपर्यंत आरटीओ कार्यालय दलालमुक्त करण्याचे आदेश काढले आहेत. या आदेशाची प्रतच सर्व आरटीओ कार्यालयांना पाठवली आहे. १९ जानेवारीपासून परिवहन आयुक्त आरटीओ कार्यालयांना अचानक भेट देणार असल्याने सगळ्याच अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
आरटीओ कार्यालयांत दलालांचा नेहमीच राबता असल्याने वाहनचालकांना लायसन्स मिळवून देणे, त्याचे नूतनीकरण करणे यासह अन्य अंतर्गत कामातही दलालांकडून मोठ्या प्रमाणात ढवळाढवळ केली जाते. प्रत्यक्षात आरटीओ दलालमुक्त व्हावे यासाठी कुठलेच अधिकारी पुढाकार घेताना दिसत नाही. त्यामुळे दलालांचे वर्चस्व आरटीओ कार्यालयांत वाढल्याचे दिसून येते. परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी यासंदर्भात आरटीओ कार्यालयांना गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार आपली कार्यालये दलालमुक्त करण्याच्या सूचनाही केल्या. मात्र त्याकडे दुर्लक्षच झाल्याने त्याची गंभीर दखल परिवहन आयुक्तांकडून घेण्यात आली. आयुक्तांनी १२ जानेवारी रोजी थेट एक लेखी पत्रच तयार करून १७ जानेवारीपर्यंत आरटीओ दलालमुक्त करण्याचे आदेशच सर्व आरटीओंना दिले. त्याचबरोबर १९ जानेवारीपासून आपण आरटीओ कार्यालयांना भेट देऊन दलालांना हटविले की नाही याची पाहणी करणार असल्याचे सांगितले आहे. याबाबत परिवहन आयुक्त महेश झगडे यांना विचारले असता, दोन महिन्यांपासून आरटीओ दलालमुक्त करा अशी सूचना अधिकाऱ्यांना केली जात आहे. आता तसे आदेशच त्यांना दिले आहेत. आदेशाची एक प्रतही परिवहन विभागाच्या वेबसाईटवर टाकली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: RTO will be free!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.