राज्यातील आरटीओंना आता ‘हँडहेल्ड’ उपकरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 04:07 AM2018-01-08T04:07:56+5:302018-01-08T04:08:36+5:30
राज्यातील प्रादेशिक परिवहन अधिका-यांना (आरटीओ) चलान फाडण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यासाठी वाहतूक पोलिसांप्रमाणे आता आरटीओ अधिकारी आॅन द स्पॉट ई-चलान देणार आहे.
मुंबई : राज्यातील प्रादेशिक परिवहन अधिका-यांना (आरटीओ) चलान फाडण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यासाठी वाहतूक पोलिसांप्रमाणे आता आरटीओ अधिकारी आॅन द स्पॉट ई-चलान देणार आहे. यासाठी १३४१ हाताने वापरण्याची उपकरणे (हँडहेल्ड) खरेदी करण्यात येतील. यासाठी १० कोटींच्या खर्चाला मान्यता देण्याचा निर्णय नुकताच शासनाने घेतला आहे.
दिल्ली येथील राष्ट्रीय सूचना केंद्रातून सूचना आल्यानंतर सरकार जागे झाले आहे. परिणामी, मोटार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रस्ते सुरक्षिततेत वाहनांची अधिक जोमाने तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी परिवहन विभागातील १ हजार ३४१ अधिकाºयांमार्फत वाहन तपासणी करण्यात येईल. या अधिकाºयांसाठी आॅनलाइन निविदांद्वारे उपकरणांची खरेदी पार पडणार आहे. या उपकरणांसाठी प्रत्येकी ७५ हजार रुपये खर्च येणार आहे. ही उपकरणे इंटरनेटमार्फत केंद्रीय संगणक यंत्रणा, अर्थात वाहन आणि सारथी यांच्याशी जोडणी करण्यात येणार आहेत.