मतदार यादीत घोळ

By Admin | Published: November 11, 2016 05:14 AM2016-11-11T05:14:03+5:302016-11-11T05:14:03+5:30

शहरात होणाऱ्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मतदार यादीत येथील मूळ रहिवासी व आॅस्करच्या स्पर्धेत गेलेल्या ‘श्वास’ चित्रपटाच्या कथालेखिका माधवी घारपुरे

Ruckus in the voter list | मतदार यादीत घोळ

मतदार यादीत घोळ

googlenewsNext

जान्हवी मोर्ये, डोंबिवली
शहरात होणाऱ्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मतदार यादीत येथील मूळ रहिवासी व आॅस्करच्या स्पर्धेत गेलेल्या ‘श्वास’ चित्रपटाच्या कथालेखिका माधवी घारपुरे यांचे नाव समाविष्ट झालेले नाही. १५ वर्षांपासून घारपुरे यांचे नाव मतदार यादीत एकदाही आले नाही. त्यामुळे संमेलनाध्यक्षपदाच्या मतदार यादीविषयी साशंकता व्यक्त होत आहे.
घारपुरे या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे शाखेच्या आजीव सदस्या आहेत. तरीही, त्यांचे नाव मतदार यादीत नाही. २००४ पासून किमान १५ साहित्य संमेलने झाली. मात्र, मतदार यादीत नाव नसल्याने त्यांना एकदाही मतदान करता आले नाही. यंदाही त्यांचे नाव मतदार यादीत न आल्याने त्यांना मतपत्रिकाच आलेली नाही. साहित्य संमेलनाची आयोजक संस्था असलेल्या आगरी युथ फोरमला ८५ मतदार सुचवण्याचा अधिकार असतो. फोरमने ८५ मतदारांची यादी तयार करून ती महामंडळाच्या अध्यक्षांकडे पाठवली. या यादीत घारपुरे यांचे नाव देणे फोरमला उचित वाटलेले नाही. त्यामुळे त्यांचे नाव मतदारयादीत आले नाही. यापूर्वीच्या आयोजकांनीही त्यांचे नाव मतदार यादीत समावेश करण्यासाठी विचार केला नाही.

Web Title: Ruckus in the voter list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.