कृषी महाविद्यालयात रॅगिंग
By admin | Published: February 25, 2016 12:30 AM2016-02-25T00:30:58+5:302016-02-25T00:30:58+5:30
नांदेड रोड परिसरातील शासकीय कृषी महाविद्यालयात द्वितीय वर्गात शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याचा गेल्या दीड वर्षांपासून सातत्याने रॅगिंग करून छळ केला जात होता.
लातूर : नांदेड रोड परिसरातील शासकीय कृषी महाविद्यालयात द्वितीय वर्गात शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याचा गेल्या दीड वर्षांपासून सातत्याने रॅगिंग करून छळ केला जात होता. या तरुणाने अखेर लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार १३ सिनियर विद्यार्थ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे़
जालिंदर महादेव दराडे (२०) असे छळ झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो बीडचा रहिवासी आहे. सिनिअर विद्यार्थी त्याला लाईटकडे अधिकवेळ पहायला लावीत, शिव्या देण्यास सांगत, मान खाली करुन उभे रहायला सांगत, प्रसंगी चाबकाचे फटके देखील मारले जात होते. हा सर्व छळ असह्य झाल्याने जालिंदर याने लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली़
त्यानुसार लातूर ग्रामीण पोलिसांनी १३ विद्यार्थ्यांच्या विरोधात कलम १४३, १४७, १४९, १०९, ३२३, ५०४ व महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंध कायदा ४ प्रमाणे बुधवारी पहाटे गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)