‘भीमा-पाटस’ची सत्ताधाऱ्यांनी वाट लावली

By Admin | Published: May 17, 2016 02:12 AM2016-05-17T02:12:43+5:302016-05-17T02:13:15+5:30

गेल्या १६ वर्षांत भीमा-पाटस साखर कारखान्याची वाट लागली असून, सभासदांच्या प्रपंचाशी खेळणाऱ्यांचा डाव उघडा पडला आहे.

The rulers of 'Bhima-Patas' were relinquished | ‘भीमा-पाटस’ची सत्ताधाऱ्यांनी वाट लावली

‘भीमा-पाटस’ची सत्ताधाऱ्यांनी वाट लावली

googlenewsNext


राहू : गेल्या १६ वर्षांत भीमा-पाटस साखर कारखान्याची वाट लागली असून, सभासदांच्या प्रपंचाशी खेळणाऱ्यांचा डाव उघडा पडला आहे. शेतकऱ्यांच्या उसाला भाव नाही, तर कामगारांचे पगार थकलेले आहेत. त्यामुळे जनता आता त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असे मत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी व्यक्त केले.
खामगाव (ता. दौंड) येथील एक कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
गेल्या वर्षभरात तालुक्यात सूडाचे राजकारण चालू असून गेली पंधरा वर्षे आमदारकी कुल कुटुंबीयांच्या घरामध्ये असताना त्यांना स्वत:च्या गावामध्ये वीज, पिण्याचे पाणी, शाळा अशा गोष्टी करता आल्या नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. भांडगाव परिसरात सुरू केलेली शिक्षण संस्था काही वर्षांत बंद करावी लागली आणि आता भीमा पाटस कारखान्याची परिस्थिती विचारात घेतली तर तालुक्यातील दौंड शुगर, श्रीनाथ म्हस्कोबा, अनुराज शुगर हेही कारखाने तालुक्यातील ऊस गाळतात, तर सर्वात कमी रिकव्हरी भीमा पाटसची आहे. साखर कारखाना चांगला चालला आहे, अशा वल्गना केल्या जातात. कामगारांचे सात-सात महिन्यांचे पगार कसे थकतात. खोटे बोला पण रेटून बोला हे आम्ही आता चालू देणार नाही, हे मी बोललेले खोटे वाटत असेल एकदा आमने-सामने होऊन जाऊ द्या, असे थोरात म्हणाले.
या वेळी वैशाली नागवडे, महेश शेळके, राजेंद्र बहिरट, संजय यादव यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला नितीन दोरगे, विजय नागवडे, दत्तोबा तांबे, जगन्नाथ नागवडे, बाजार समितीचे सभापती विठ्ठल थोरात, काका तापकीर, उपसरपंच संदीप जगताप, अनिल नागवडे, अजय थोरात, नीलेश म्हेत्रे, विशाल म्हेत्रे, योगेश जगताप, नानासाहेब दळवी, बाबासाहेब कोळपे, कैलास सुरेश नागवडे, कोळपे माजी सरपंच संजय जगताप, अविनाश जगताप, काळुराम नागवडे, नागेश नागवडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: The rulers of 'Bhima-Patas' were relinquished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.