'थ्रील' अनुभवण्यासाठी 'तिने' पसरवली दहशतवाद्यांची अफवा

By admin | Published: September 29, 2016 10:24 AM2016-09-29T10:24:04+5:302016-09-29T12:31:27+5:30

उरण परिसरात 4-5 शस्त्रधारी दहशतवादी शिरल्याची माहिती खोटी असल्याचे समोर आले आहे. उरणमध्ये दहशतवादी फिरत असल्याची घटना मुळात प्रत्यक्षात घडलीच नाही.

The rumors of 'she spread' terrorists to experience 'thrill' | 'थ्रील' अनुभवण्यासाठी 'तिने' पसरवली दहशतवाद्यांची अफवा

'थ्रील' अनुभवण्यासाठी 'तिने' पसरवली दहशतवाद्यांची अफवा

Next
>
ऑनलाइन लोकमत 
रायगड, दि.29  - उरण परिसरात 4-5 शस्त्रधारी दहशतवादी दिसल्याची माहिती खोटी असल्याची माहिती समोर आली आहे. उरणमध्ये दहशतवादी फिरत असल्याची घटना मुळात प्रत्यक्षात घडलीच नाही. फक्त आणि फक्त 'थ्रील' अनुभवण्यासाठी 12  वर्षांच्या शाळकरी मुलीने ही अफवा पसरवली, अशी धक्कादायक आणि तितकीच संतापजनक माहिती एका तपास अधिका-याने दिली आहे. केलेली चूक मान्य केल्यानंतर या मुलीला समज देऊन सोडण्यात आले, असंही तपास अधिका-यांनी सांगितले.
 
(Exclusive : उरण दहशतवाद प्रकरणी विद्यार्थ्यांची दोन तास चौकशी)
 
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अफवा पसरवणा-या मुलीनं काही दिवसांपूर्वी इस्लामिक स्टेटच्या शस्त्रधारी दहशतवाद्यांचे फोटो पाहिले होते.फोटो पाहिल्यानंतर तिनं उरणमध्ये  पठाणी सुट घातलेले, वेगळ्या भाषेत बोलणारे आणि शस्त्रधारी 4-5 संशयित पाहिल्याची अफवा केवळ 'थ्रील' अनुभवण्यासाठी पसरवली. उरी दहशतवादी हल्ल्यात 18 जवान शहीद झाल्याची घटना चार दिवसांपूर्वीच घडली होती. त्यामुळे उरणमध्ये संशयित व्यक्ती दिसल्याची माहिती दुर्लक्षित करुन चालणार नव्हती असं अधिका-याने सांगितलं आहे.
 
(उरणचे सर्च ऑपरेशन थांबले)
 
दहशतवादी शिरल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीनं तपास यंत्रणांनी मुंबईसह राज्यभरात हाय अलर्ट जारी करत शोधमोहीम सुरू केली. मात्र शोधमोहीमेदरम्यान संशयित असे काहीही आढळले नाही. दरम्यान,अशा अफवांमुळे तपास यंत्रणांचा वेळ आणि पैसा विनाकारण खर्च होतो, हे देखील नागरिकांनी कळले पाहिजे, असं तपास अधिका-यांनी म्हटले आहे. 
 
 
 
 
 

Web Title: The rumors of 'she spread' terrorists to experience 'thrill'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.