महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: 'मुख्यमंत्र्यांनी 16 हजार शेतकऱ्यांची कुटुंब उद्धवस्त केली' - रुपाली चाकणकर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 12:32 PM2019-09-10T12:32:42+5:302019-09-10T12:47:56+5:30
Maharashtra Assembly Election 2019 : राज्यात अनेक प्रश्न असताना मुख्यमंत्री हे, एक निवडणूक जिंकली की दुसरी येणारी निवडणूक कशी जिंकायची व फोडाफाडीचे राजकरण कसे करायचे याच्याच तयारीत असतात.
मुंबई - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे, त्यामुळे सत्ताधारी पक्ष व विरोधकात आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. सोमवारी राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी बल्लारपूर येथे झालेल्या सभेत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील 16 हजार शेतकऱ्यांचा जीव घेतला असून त्यांची कुटुंब उद्धवस्त केला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
बल्लारपूर येथील सभेत चाकणकर यांनी मुख्यमंत्री यांच्य्यावर टीका करताना म्हणाल्या की, ज्यावेळी मुख्यमंत्री विरोधात होते. त्यावेळी शेतकरी आत्महत्या झाल्यावर सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी फडणवीस हे करत होते. मात्र आता तर मुख्यमंत्र्यांनी 16 हजार शेतकऱ्यांचा जीव घेतला असून त्यांचे कुटुंब उद्धवस्त केला असल्याचा ठपका त्यांच्यावर असल्याचा आरोप चाकणकर यांनी केला.
मुख्यमंत्र्यांनी 16 हजार शेतकऱ्यांची कुटुंब उद्धवस्त केली: रुपाली चाकणकर pic.twitter.com/asr74DDkIw
— Lokmat (@MiLOKMAT) September 10, 2019
राज्यात अनेक प्रश्न असताना मुख्यमंत्री हे, एक निवडणूक जिंकली की दुसरी येणारी निवडणूक कशी जिंकायची व फोडाफाडीचे राजकरण कसे करायचे याच्याच तयारीत असतात. त्यामुळे त्यांच्या सरकारने हे मान्य केलं आहे की, ग्रामपंचायतला सुद्धा निवडून येऊ शकत नाहीत असे लोकं मंत्री झाले आहेत. त्यामुळेच राज्याचा कारभार कसा चालवावा हे त्यांच्या मंत्र्यांना कळत नसल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला.