...अन्यथा भाजप कार्यकर्त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही : रुपाली चाकणकर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 03:33 PM2020-01-13T15:33:24+5:302020-01-13T15:35:53+5:30

महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करून घेणारे नरेंद्र मोदी यांनी त्वरित महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली पाहिजे अशी मागणी चाकणकर यांनी केली आहे.

rupali chakankar has criticized the bjp | ...अन्यथा भाजप कार्यकर्त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही : रुपाली चाकणकर

...अन्यथा भाजप कार्यकर्त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही : रुपाली चाकणकर

Next

मुंबई : महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्रातील शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. तर राजकीय मंडळी देखील पंतप्रधान मोदी आणि पुस्तक लिहिणाऱ्यांवर टीका करत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सुद्धा याच मुद्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे.

या आधी "नगरचे उपनगराध्यक्ष श्रीपाद छिंदमकडून छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी, पाठ्यपुस्तकात जिजाऊ माँसाहेबांचा केलेला अपमान आणि आता 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकाचे प्रकाशन यावरून भाजपची छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अपमान करण्याची वृत्ती दिसून येते. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करून घेणारे नरेंद्र मोदी यांनी त्वरित महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली पाहिजे" अशी मागणी चाकणकर यांनी केली आहे.

तर छञपती शिवाजी महाराजांची तुलना कोणीही कुणाशीच करूच शकत नाही इतके ते महान आहेत. मोदींना कदाचित महाराजांनी सूरतवर गाजविलेल्या पराक्रमाची सल अजून बोचत असावी, म्हणून तसा प्रयत्न करून महाराष्ट्राचा अपमान करण्याची संधी ते शोधत असतात असा आरोप सुद्धा यावेळी रुपाली चाकणर यांनी केला आहे.

तसेच या प्रकरणी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध तर आहेच परंतु त्यांनी त्वरित याबाबत जनतेची माफीदेखील मागितली पाहिजे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसचा महिला पदाधिकारी भाजपाच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे.

 

`

Web Title: rupali chakankar has criticized the bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.