गंजलेल्या वाहनांचा आरटीओला गराडा

By Admin | Published: June 10, 2016 02:53 AM2016-06-10T02:53:04+5:302016-06-10T02:53:04+5:30

अगोदरच भाड्याच्या जागेत सुरू असलेल्या पनवेल आरटीओला जुनाट आणि गंजलेल्या वाहनांचा गराडा पडला आहे.

The rusted vehicles of the rugged vehicles | गंजलेल्या वाहनांचा आरटीओला गराडा

गंजलेल्या वाहनांचा आरटीओला गराडा

googlenewsNext


कळंबोली : अगोदरच भाड्याच्या जागेत सुरू असलेल्या पनवेल आरटीओला जुनाट आणि गंजलेल्या वाहनांचा गराडा पडला आहे. या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात जागा व्यापली असून रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. ही वाहने निकाली काढण्याकरिता आरटीओकडून विलंब होत आहे. त्यामुळे लोह-पोलाद मार्केटचा प्रशासकीय इमारत परिसर विद्रूप दिसू लागला आहे.
२०१० साली पनवेल प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कर्नाळा अकादमी या ठिकाणी सुरू झाले. ही जागा अपुरी पडत असल्याने लोह-पोलाद मार्केट कमिटीच्या प्रशासकीय भवनात कार्यालय हलविण्यात आले. आरटीओ कार्यालयामुळे लोह पोलाद मार्केटच्या प्रशासकीय इमारतीभोवती वाहनांची मोठी वर्दळ असते. आरटीओने जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव वेळोवेळी होत नसल्याने भंगार झालेल्या रिक्षांची संख्या वाढत चालली आहे. या वाहनांनी मोठ्या प्रमाणात जागा व्यापली आहे. याशिवाय कारवाई करून आणलेली इतर वाहने या ठिकाणी उभी करण्यात आलेली आहेत. (वार्ताहर)
भंगारामध्ये स्क्र ॅप रिक्षा तसेच कारवाई केलेली वाहने सुध्दा आहेत. त्यांना नोटिसा बजाविण्याचे काम सुरू आहे. एकूण ७५ मालकांची फाईल तयार केली आहे. पुढच्या महिन्यात लिलाव करून विशेष स्क्र ॅप रिक्षांची विल्हेवाट लावण्यात येईल. त्याचबरोबर इतर वाहनांसंदर्भात निर्णय घेऊ.
- आनंद पाटील,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
पनवेल

Web Title: The rusted vehicles of the rugged vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.