पत्नीने पतीसोबत शरीरसंबंध नाकारणे क्रूरता

By admin | Published: January 13, 2017 08:54 PM2017-01-13T20:54:26+5:302017-01-13T20:54:26+5:30

पत्नीने पतीसोबत शरीरसंबंध ठेवण्यास आणि एकत्र राहण्यास नकार देणे ही बाब क्रूरतेमध्ये मोडते, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदविले आहे.

Ruthlessness refuses to relate to her husband's relationship with her husband | पत्नीने पतीसोबत शरीरसंबंध नाकारणे क्रूरता

पत्नीने पतीसोबत शरीरसंबंध नाकारणे क्रूरता

Next

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 13 - पत्नीने पतीसोबत शरीरसंबंध ठेवण्यास आणि एकत्र राहण्यास नकार देणे ही बाब क्रूरतेमध्ये मोडते, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदविले आहे.
प्रकरणातील पत्नी पतीसोबत शरीरसंबंध ठेवण्यास नकार देत होती. तसेच, ती पतीसोबत राहण्यास तयार नव्हती. वारंवार माहेरी जात होती. स्वत:हून सासरी परत येत नव्हती. तिला घ्यायला जावे लागत होते. ती घरकामे करण्यास टाळाटाळ करीत होती. संयुक्त कुटुंबात राहण्याची तिची तयारी नव्हती. तिला स्वतंत्र रहायचे होते. अनेकदा समजावूनही तिने आपल्या स्वभावात परिवर्तन केले नाही. त्यामुळे पतीने पत्नीच्या क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट मिळण्यासाठी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली होती. १४ एप्रिल २०११ रोजी कुटुंब न्यायालयाने याचिका मंजूर केली. या निर्णयाविरुद्ध पत्नीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती वासंती नाईक व विनय देशपांडे यांनी वरीलप्रमाणे मत नोंदवून पत्नीची एकूणच वागणूक पाहता अपील फेटाळून लावले व कुटुंब न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. 
पत्नी अकोला तर, पती यवतमाळ येथील रहिवासी आहे. १७ डिसेंबर २००१ रोजी अकोला येथे त्यांचे लग्न झाले होते. पत्नीने तिच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते. सासरची मंडळी तंबाखाचा व्यवसाय वाढविण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी करीत होते. पैसे न दिल्यामुळे वाईट वागणूक देत होते. त्यांनी घरातून बाहेर काढले अशी बाजू तिने मांडली होती. परंतु, उलट तपासणीमध्ये ती वारंवार माहेरी जाऊन रहात असल्याचे आणि नव-यासोबत राहण्यास व शरीरसंबंध ठेवण्यास नकार देत असल्याचे स्पष्ट झाले.

Web Title: Ruthlessness refuses to relate to her husband's relationship with her husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.