Andheri Bypolls 2022: “अंधेरीची पोटनिवडणूक ऋतुजा लटके एकतर्फी जिंकतील”; राष्ट्रवादी काँग्रेसने व्यक्त केला ठाम विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 12:11 PM2022-10-14T12:11:56+5:302022-10-14T12:12:55+5:30

Andheri Bypolls 2022: ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्याबाबत झाले ते शोभनीय नसून, शिंदे आणि ठाकरे गटातील राजकारण राज्यासाठी घातक असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्याने म्हटले आहे.

rutuja latke to win andheri bypoll election unilaterally claims ncp mp sunil tatkare | Andheri Bypolls 2022: “अंधेरीची पोटनिवडणूक ऋतुजा लटके एकतर्फी जिंकतील”; राष्ट्रवादी काँग्रेसने व्यक्त केला ठाम विश्वास

Andheri Bypolls 2022: “अंधेरीची पोटनिवडणूक ऋतुजा लटके एकतर्फी जिंकतील”; राष्ट्रवादी काँग्रेसने व्यक्त केला ठाम विश्वास

googlenewsNext

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना दिलासा दिल्यानंतर अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी (Andheri Bypolls 2022) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने ताकदीने कामाला सुरुवात केली आहे. दुसरीकडे बाळासाहेबांच्या शिवसेनेने म्हणजेच शिंदे गटाने यातून माघार घेत भाजपच्या मुरजी पटेल यांना पाठिंबा दर्शवला आहे. तर या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला आहे. यातच अंधेरीची पोटनिवडणूक ऋतुजा लटके एकतर्फी जिंकतील, असा विश्वास राष्ट्रवादीच्या खासदाराकडून व्यक्त करण्यात आला आहे. 

राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार सुनील तटकरे यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित असल्याचे म्हटले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांना काँग्रेससह राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे. महाविकास आघाडीतून त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे तटकरे यांनी सांगितले.

शिंदे आणि ठाकरे गटातील राजकारण महाराष्ट्रासाठी घातक 

मागील वेळेस शिवसेना आणि काँग्रेस पक्ष अशीच लढत झाली . भाजपने अपक्ष उमेदवार म्हणून मुरजी पटेल यांना उभे केले होते. त्यावेळी त्यांच्या पाठी कोणती शक्ती होती. हे आता अनुभवायला मिळाले आहे‌. ऋतुजा लटके यांनी एक महिना आधी राजीनामा दिला होता. त्यांचे एक महिन्याचे वेतन कोषागार कार्यालयातून जमा झाले होते. मात्र, त्यांचा निवडणूक लढविण्याचा हक्क डावलण्याचा प्रयत्न महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आला. त्यासाठी त्यांना न्यायालयात दाद मागावी लागली. न्यायालयाने महानगरपालिकेच्या कृतीला चपराक दिले आहे. न्यायालयाने फटकारल्यानंतर लटके यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. गेल्या अनेक वर्षाच्या महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला छेद देण्याच्या घटना घडत आहेत. शिंदे आणि ठाकरे गटात जे राजकारण सुरु आहे ते महाराष्ट्रासाठी घातक आहे, अशी घणाघाती टीका सुनील तटकरे यांनी केली. 

दरम्यान, ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याबाबत जे झाले ते शोभनीय नाही. वैचारिक लढाई लढली गेली पाहिजे, प्रत्येक पक्षाची विचारधारा आहे, प्रत्येकजण निवडणुकीला सामोरे जात असतो. जनता त्याबाबत योग्य तो निर्णय घेत असते. पण निवडणुकीच्या प्रक्रियेतून मुद्दाम बाजूला करून निवडणूक लढता येऊ नये असे कृत्य शासन मान्य यंत्रणेच्या माध्यमातून करणे चुकीचे आहे, असे तटकरे म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: rutuja latke to win andheri bypoll election unilaterally claims ncp mp sunil tatkare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.