सबनीसांनी इतरांचा मान ठेवावा
By admin | Published: January 12, 2016 01:57 AM2016-01-12T01:57:20+5:302016-01-12T01:57:20+5:30
मत मांडणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मात्र, पंतप्रधान ही आदरणीय व्यक्ती आहे. तुमच्या खुर्चीसंदर्भात कोणी भाष्य केले, तर त्याबद्दल तुम्ही इतरांना जबाबदार धरता; मग इतरांचाही
पिंपरी : मत मांडणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मात्र, पंतप्रधान ही आदरणीय व्यक्ती आहे. तुमच्या खुर्चीसंदर्भात कोणी भाष्य केले, तर त्याबद्दल तुम्ही इतरांना जबाबदार धरता; मग इतरांचाही आदर ठेवायला हवा, असे सांगत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी पुढाकार घेऊन हा वाद मिटवावा, असे आवाहन साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी केले.
पिंपरी येथे ८९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. त्याची पाहणी केल्यानंतर डॉ. पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले, संमेलन हा मराठी भाषेचा गौरव करणारा उत्सव आहे. हा उत्सव चांगला व्हावा, ही जबाबदारी सर्वांची आहे. मी सबनीस यांची भेट घेऊन या वादावर पडदा टाकण्याची विनंती करणार आहे. माझ्या मते शहरात हे संमेलन पहिल्यांदाच होत आहे. परमेश्वराने आपणास संधी उपलब्ध करून दिली असेल, तर त्या संधीचे सोने होईल, या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत, असेही ते म्हणाले.