"सचिन..अ बिलिअन ड्रीम्स" महाराष्ट्रात करमुक्त
By Admin | Published: May 26, 2017 07:00 PM2017-05-26T19:00:52+5:302017-05-26T20:03:47+5:30
भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर आधारीत "सचिन..अ बिलिअन ड्रीम्स" हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त झाला आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26 - भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर आधारीत "सचिन..अ बिलिअन ड्रीम्स" हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त झाला आहे. क्रीडा क्षेत्रात सचिन दिलेल्या योगदानाचा सन्मान आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चित्रपट पोहोचावा या दुहेरी उद्देशाने महाराष्ट्र सरकारने या चित्रपटावरील मनोरंजन कर माफ केला आहे.
ब्रिटीश दिग्दर्शक जेम्स एर्स्किन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. देशभरातील सिनेमागृहात आज हा चित्रपट प्रदर्शित झाला असून, सचिनच्या आयुष्यातील अनेक माहिती नसलेल्या गोष्टी या चित्रपटातून समजणार आहेत. ओडिसा, केरळ आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये हा चित्रपट आधीच करमुक्त झाला आहे.
सचिनच्या जीवनचरित्रातून राज्यातील अनेक तरुणांना प्रेरणा मिळेल या हेतून हा चित्रपट टॅक्स फ्रीचा निर्णय घेण्यात आला असे आसामचे अर्थमंत्री शशीभूषण बेहेरा यांनी सांगितले. या चित्रपटात सचिनचा बालपणापासून ते क्रिकेटचा देव बनण्यापर्यंतचा जीवन प्रवास उलगडला जाणार आहे. गेल्या वर्षी धोनीच्या आत्मकथेवर चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटाला चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली होती. आता सचिनचा आत्मकथेवर आधारीत चित्रपटाची क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे.