बीडच्या शाळेसाठी सचिनने केली मदत
By admin | Published: April 11, 2016 02:45 AM2016-04-11T02:45:36+5:302016-04-11T02:45:36+5:30
वंचित मुलांच्या पालनपोषण आणि शिक्षणासाठी काम करणाऱ्या शांतिवनमध्ये (आर्वी, ता. शिरूर कासार) बांधण्यात येणाऱ्या सरस्वती साधना विद्यामंदिर इमारतीसाठी मास्टर
बीड : वंचित मुलांच्या पालनपोषण आणि शिक्षणासाठी काम करणाऱ्या शांतिवनमध्ये (आर्वी, ता. शिरूर कासार) बांधण्यात येणाऱ्या सरस्वती साधना विद्यामंदिर इमारतीसाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने खासदार निधीतून ४० लाख रु पयांची मदत केली आहे.
शांतिवनात ऊसतोड कामगार, तमाशा कलावंत, आमहत्या केलेले शेतकरी यांची मुले तसेच अनाथ, लालबत्ती भाग, भीक मागणाऱ्या मुलांचे पालनपोषण आणि शिक्षणाचे काम १४ वर्षांपासून दीपक आणि कावेरी नागरगोजे हे दाम्पत्य करीत आहे. ३०० मुलांचे कायम निवासी पालकत्व आणि ४८७ मुले शिक्षण घेण्यासाठी शांतिवनात येतात. डॉ. मंदार परांजपे आणि क्रीडा समीक्षक सुनंदन लेले यांनी शांतिवनातील कार्याचा आढावा घेऊन त्याबाबत सचिनला कळविले होते. ‘शांतिवन’च्या सामाजिक कामावर प्रभावित होऊन सचिनने मदत दिली.