खासदार सचिन तेंडुलकरने गावाच्या रस्ते विकासासाठी केली १२ लाखांची मदत

By admin | Published: April 8, 2016 11:18 PM2016-04-08T23:18:09+5:302016-04-09T00:45:47+5:30

सचिन तेंडुलकरने आपल्या खासदार निधीतून अक्कलकोट तालुक्यातील कोन्हाळी गावाच्या रस्ते तसेच इतर विकासासाठी तब्बल १२ लाख रुपयांचा निधी देऊन एक आदर्श निर्माण केला आहे

Sachin Tendulkar helped 12 lakh people for the development of village roads | खासदार सचिन तेंडुलकरने गावाच्या रस्ते विकासासाठी केली १२ लाखांची मदत

खासदार सचिन तेंडुलकरने गावाच्या रस्ते विकासासाठी केली १२ लाखांची मदत

Next
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. ८ - तो क्रिकेटचा देव आहे. तो करोडो किक्रेटप्रेमींच्या गळ्यातला ताईत आहे. तो जेव्हा मैदानावर उतरायचा तेव्हा त्याची बॅट तळपायची. तो खेळायचा तेव्हा धावांचा अक्षरश : पाऊस पडायचा. तो जितका शांत तितका संवेदनशीलही. होय आपण बोलतोय ते मास्टर ब्लास्टर आणि खासदार सचिन तेंडुलकर विषयी. त्याने सोलापूर मधील एका गावाला रस्ते विकासासाठी खासदार निधीतून १२ लाख रुपयांची मदत देऊ केली आहे. 
 
एकीकडे देशातील अनेक खासदारांना मिळणारा निधी पूर्णपणे वापरला जात नाही, असे आरोप होत आहेत. तर अशावेळी राजकारणाचा गंधही नसलेल्या व राज्यसभेत खासदार म्हणून नेमणूक झालेल्या सचिन तेंडुलकरने आपल्या खासदार निधीतून अक्कलकोट तालुक्यातील कोन्हाळी गावाच्या रस्ते तसेच इतर विकासासाठी तब्बल १२ लाख रुपयांचा निधी देऊन एक आदर्श निर्माण केला आहे. खासदारांना सर्वसामान्या नागरीकांनी पत्र पाठवले आणि त्यांनी त्याची लेगेचच दखल घेतली आणि पैसेही दिले असा दुर्मीळच योग पहावयाला मिळतो. गावच्या सरपंच सौ.सुमित्रा बाबुराव बनसोडे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे निधी मिळाला असल्याचं कोन्हाळी गावकऱ्याचं म्हणंण आहे.
 
 
 
अनेकदा निधी मिळताना टक्केवारी घेतली असल्याचा अनुभव आलेला असताना कोणी मध्यस्थ नसतांना सचिन तेंडुलकर यांनी केलेली मदत म्हणजे एक संवेदनशील माणसाने केलेली मदत असल्याचं कोन्हाळी गावच्या सरपंच सुमीत्रा बनसोडे यांच म्हणणं आहे. यामदतीमुळे गावात आनंदाचे वातावरण आहे. 
 
क्रिकेटचा देव अशी ओळख असलेल्या तेंडुलकरन आपल्या खासदार निधीतून गावातील विकासकामासाठी केलेली मदत ग्रामीण भागातील राजकीय नेत्यांसाठी एक आदर्श असून देशातील अन्य खासदार ही प्रेरणा घेणार का, हा प्रश्नच आहे.

Web Title: Sachin Tendulkar helped 12 lakh people for the development of village roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.