सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 10:15 AM2024-05-15T10:15:18+5:302024-05-15T10:16:40+5:30
जामनेर येथे जवानाची गोळी झाडून आत्महत्या
मोहन सारस्वत
जामनेर (जि.जळगाव) : सुटी घेऊन घरी आलेल्या सीआरपीएफ जवानाने बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना जामनेर येथे मंगळवारी रात्री घडली.
प्रकाश गोविंदा कापडे (३७, रा.गणपती नगर,जामनेर) असे मृत जवानाचे नाव आहे. यापूर्वी त्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे, मंत्री छगन भुजबळ व क्रिकेट खेळाडू सचिन तेडुलकर यांच्याकडे अंगरक्षक म्हणून काम केले आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ, बहिण असा परिवार आहे.
कापडे यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सध्या कापडे हे सचिन तेंडुलकरच्या घरी सुरक्षा रक्षकाचे काम करत होते. गेल्या आठ दिवसांपासून ते गावी आले होते. आज पहाटे त्यां नी आत्महत्या केली. याची खबर पसरताच लोकांनी त्यांच्या घराजवळ गर्दी केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.