सचिन वाझेची पोलीस दलातून हकालपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 06:06 AM2021-05-12T06:06:06+5:302021-05-12T06:06:06+5:30
वाझेला पुन्हा खात्यात घेण्यापासून गुन्हेगारी गुप्तवार्ता कक्षात नियुक्ती करीत, त्याच्याकडे तपासासाठी दिलेल्या मोठ्या प्रकरणापर्यंत सर्वच गोष्टी संशयाच्या फेऱ्यात अडकल्या. वाझेला एनआयएने अटक केल्यानंतर खळबळ उडाली हाेती.
मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कार प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केलेला पोलीस अधिकारी सचिन वाझेची मंगळवारी अखेर पोलीस दलातून हकालपट्टी करण्यात आली. मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी ही कारवाई केली.
वाझेला पुन्हा खात्यात घेण्यापासून गुन्हेगारी गुप्तवार्ता कक्षात नियुक्ती करीत, त्याच्याकडे तपासासाठी दिलेल्या मोठ्या प्रकरणापर्यंत सर्वच गोष्टी संशयाच्या फेऱ्यात अडकल्या. वाझेला एनआयएने अटक केल्यानंतर खळबळ उडाली हाेती. नगराळे यांच्या अहवालात एनआयएने वाझेवर ठेवलेल्या आरोपांचा समावेश आहे. यात वाझेने अंबानींच्या घराजवळ स्फोटके भरलेली कार पार्क करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला, तसेच पुरावे नष्ट केले. त्याच्यावर ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येचा आरोप आहे.