शिक्षक भरतीतील गैरप्रकार रोखण्यासाठी ‘पवित्र’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2018 05:49 AM2018-07-08T05:49:06+5:302018-07-08T05:49:20+5:30

खासगी शिक्षण संस्थांच्या शाळा त्याचप्रमाणे समाज कल्याण विभाग, आदिवासी विभाग यांच्या अंतर्गत होणारी शिक्षक भरती ही त्या-त्या विभागाकडून स्वतंत्रपणे केली जात होती, परंतु आता ‘पवित्र’ या वेबपोर्टलच्या माध्यमातून ही शिक्षक भरती केंद्रीय पद्धतीने एकाच प्रणालीमार्फत केली जाणार आहे.

 'Sacred' to prevent malpractices in teacher recruitment | शिक्षक भरतीतील गैरप्रकार रोखण्यासाठी ‘पवित्र’

शिक्षक भरतीतील गैरप्रकार रोखण्यासाठी ‘पवित्र’

googlenewsNext

मुंबई - खासगी शिक्षण संस्थांच्या शाळा त्याचप्रमाणे समाज कल्याण विभाग, आदिवासी विभाग यांच्या अंतर्गत होणारी शिक्षक भरती ही त्या-त्या विभागाकडून स्वतंत्रपणे केली जात होती, परंतु आता ‘पवित्र’ या वेबपोर्टलच्या माध्यमातून ही शिक्षक भरती केंद्रीय पद्धतीने एकाच प्रणालीमार्फत केली जाणार आहे. त्यानुसार, भावी शिक्षकांना त्यांना काम करावयाच्या २० शाळांचा पसंतीक्रम भरावा लागणार आहे. या नव्या पोर्टलमुळे शिक्षक भरतीतील गैरप्रकार रोखण्यासह संस्थांच्या मनमानीलाही चाप बसेल, अशी अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते या वेबपोर्टलचे उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले. यापूर्वी खासगी शिक्षण संस्थांच्या शाळा त्याचप्रमाणे, समाज कल्याण विभाग, आदिवासी विभाग यांच्या अंतर्गत होणारी शिक्षक भरती ही त्या-त्या विभागाकडून स्वतंत्रपणे केली जात होती़ परंतु आता पवित्र या वेबपोर्टलच्या माध्यमातून ही शिक्षक भरती केंद्रीय पद्धतीने एकाच प्रणालीमार्फत केली जाणार आहे. उपरोक्त नमूद केलेल्या संबंधित विभागामध्ये शिक्षक पदाच्या रिक्त जागा असतील, तर त्या संबंधित विभागाने रिक्त पदांची माहिती पवित्र या वेबपोर्टलवर देणे बंधनकारक असणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शिक्षक भरतीतील गैरव्यवहार रोखणे, तसेच खासगी संस्थांच्या मनमानीला चाप बसणे शक्य होणार आहे. महानगरपालिका शिक्षण विभागामध्ये मदत कक्षही उभारण्यात आला आहे.

कोण करू शकतात अर्ज?

अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये ० पेक्षा अधिक गुण प्राप्त असलेले विद्यार्थी व शिक्षक पात्रता परीक्षा पात्र विद्यार्थी हे इयत्ता १ली ते ५वी, तसेच इयत्ता ६वी ते ८वी मधील प्रवर्गानुसार व समांतर आरक्षणानुसार रिक्त जागांवर पवित्र प्रणालीमध्ये अर्ज करू शकतात.
इयत्ता ९ वी ते १२ वी साठीच्या रिक्त जागांवर अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये ० पेक्षा अधिक गुण मिळालेले विद्यार्थी अर्ज करू शकतात.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल. नोंदणी करण्यासाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा आसन क्रमांक हाच उमेदवाराचा युजर आयडी असेल. नोंदणी करण्यासाठीची कार्यपद्धती युजर मॅन्युअलमध्ये आहे.

असे होणार भरतीचे काम
पहिला टप्पा - पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांनी स्वत:ची माहिती भरणे.
दुसरा टप्पा - संस्थांनी पवित्र प्रणालीमध्ये आॅनलाइन, तसेच स्थानिक वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध करणे.
तिसरा टप्पा - संस्थांच्या जाहिरातीनुसार उमेदवारांनी २० पसंतीक्रम निवडणे.
चौथा टप्पा - गुणवत्तेनुसार संस्थांना निवड याद्या उपलब्ध करून देणे.

Web Title:  'Sacred' to prevent malpractices in teacher recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.