“दारुच्या एका क्वॉर्टरला जेवढे पैसे लागतात, तेवढी किंमत एक लीटर दुधाला द्या”: सदाभाऊ खोत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 11:10 AM2023-06-19T11:10:19+5:302023-06-19T11:11:14+5:30

Sadabhau Khot: ही भाववाढ देणे अवघड नाही. त्याने महागाई वगैरे काही वाढत नाही, असा दावा सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

sadabhau khot demand to hike price of milk to farmers | “दारुच्या एका क्वॉर्टरला जेवढे पैसे लागतात, तेवढी किंमत एक लीटर दुधाला द्या”: सदाभाऊ खोत

“दारुच्या एका क्वॉर्टरला जेवढे पैसे लागतात, तेवढी किंमत एक लीटर दुधाला द्या”: सदाभाऊ खोत

googlenewsNext

Sadabhau Khot: गेल्या काही दिवसांपासून अनेकविध मागण्या शिंदे-फडणवीस सरकारकडे केल्या जात आहेत. यातच आता रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी अजब मागणी केली आहे. दारुच्या एका क्वॉर्टरला जेवढे पैसे लागतात, तेवढी किंमत एक लीटर दुधाला द्या, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या ऊस बिलासाठी १ जुलैला कारखान्यासमोर एक दिवस धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला. 

इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक येथे रयत क्रांती संघटनेचा शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी सदाभाऊ खोत यांनी ही सदर मागणी केली आहे. देशी दारूच्या एका बाटलीची जेवढी किंमत आहे, तेवढे पैसे आम्हाला नकोत. पण देशी दारूच्या एका क्वॉर्टरसाठी जेवढे पैसे लागतात तेवढी किंमत एक लिटर दुधाला द्यावी, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. तसेच गाईच्या दुधाला प्रति लिटरला ७५ रुपये भाव मिळाला पाहिजे. तर म्हशीच्या दुधाला १२५ रुपये प्रति लीटरला भाव मिळाला पाहिजे. ही भाववाढ देणे अवघड नाही. त्याने महागाई वगैरे काही वाढत नाही. उलट शेतकऱ्याला जर भाव दिला तर महागाई निश्चित मनाने कमी होईल. कारण महागाईची ज्यांना झळ पोहचते ती माणसे शेतीवरती काम करायला येतात. शेतकरी मग त्यांना दोन पैसे देतो, असे सदाभाऊ खोत म्हणाले.

संजय राऊतांना लगावला खोचक टोला

शिवसेना ठाकरे गटाच्या सभेत, जोपर्यंत इच्छा असेल तोपर्यंत महाविकास आघाडीबरोबर राहू आणि त्यानंतर स्वतःच भगवा फडकवू, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. यावर सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली. दादा कोंडकेंनी इच्छा माझी पुरी करा, सादर केले होते. दादा कोंडके यांचा टू पार्ट म्हणजे संजय राऊत आहेत. त्यामुळेच ते इच्छा माझी पुरी करा म्हणत आहेत, असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला.

दरम्यान, गावगाड्यातल्या शेतकऱ्यांच्या पोराला आणि शेतकऱ्याला आम्ही जागे करू. कारण शेतकऱ्याच्या घामाचे पैसे असलेल्या साखर कारखानदारांने ते पैसे दिले नाहीत. पैसे देणे गरजेचे आहे. पेरणी हंगाम तोंडावर आलेला आहे. शेतकऱ्यांकडे अनेक समस्या आहेत. ३० जूनपर्यंत पैसे दिले नाहीत तर १ जुलै रोजी साखर कारखांन्याच्या समोर आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत. त्यावरही कारखान्याने पैसे नाही दिले तर पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली जाईल, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला.
 

Web Title: sadabhau khot demand to hike price of milk to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.