सदाभाऊ खोत यांच्या प्रकृतीत बिघाड, हॉस्पिटलमध्ये केले दाखल

By Admin | Published: April 15, 2017 10:29 PM2017-04-15T22:29:45+5:302017-04-15T23:12:06+5:30

कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्यानं त्यांना चिखली येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Sadabhau Khot has been admitted in a disorder in the hospital | सदाभाऊ खोत यांच्या प्रकृतीत बिघाड, हॉस्पिटलमध्ये केले दाखल

सदाभाऊ खोत यांच्या प्रकृतीत बिघाड, हॉस्पिटलमध्ये केले दाखल

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 15 - कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्यानं  त्यांना चिखली येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.   कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत शनिवार व रविवार व-हाडच्या दौ-यावर होते.
 
शनिवारी अकोला येथे त्यांनी सभा घेतली. त्यानंतर दुपारी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात त्यांची कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या समवेत सभा पार पडली. त्यानंतर सायंकाळी त्यांनी बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथे सभा घेतली. ही सभा पार पडल्यानंतर ते चिखली येथे मुक्कामासाठी निघाले. यावेळी त्यांच्यासोबत वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर होते.
 
मात्र डोणगाववरून चिखलीला येत असताना अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यांना उलट्यांसोबत श्वास घेताना त्रास होऊ लागला.  त्यामुळे त्यांना चिखली येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत डॉ. सुहास खेडेकर यांनी त्यांची तपासणी केली असून,  प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.

Web Title: Sadabhau Khot has been admitted in a disorder in the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.