सदाभाऊ खोत यांना कोरोनाची लागण; झाले क्वारंटाईन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 12:20 PM2020-08-26T12:20:46+5:302020-08-26T12:59:44+5:30
सदाभाऊ खोत यांनीच फेसबुकवर याची माहिती दिली आहे.
इस्लामपूर (जि. सांगली) : रयत क्रांती संघटनेचे संस्थापक व माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना कोरोना बाधा झाली आहे. त्यांनी स्वत: सोशल मीडियावरून याबाबतची माहिती दिली.
‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, मात्र मी आता उत्तम आहे. क्वारंटाईन झालो आहे. आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, लवकरच आपल्या सेवेत हजर राहीन’, अशी पोस्ट त्यांनी केली आहे.
जिल्ह्यात यापूर्वी आमदार सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, आ. मोहनराव कदम, माजी आमदार संभाजी पवार, नितिन शिंदे यांना कोरोना झाला होता. यातील काहीजण त्यातून बाहेर पडले आहेत. जिल्ह्यात अनेक राजकारण्यांना कोरोना बाधा झाली आहे.
माझी कोवीड19,पाॅझिटीव आली आहे मी आता उतम आहे,व मी क्वॉरनटाईन,झालो आहे,तरी आपण आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या,गणेशरायच्या व आपल्या सर्वाच्या आशीर्वादाने लवकरच आपल्या सेवेत हाजर राहीन, धन्यवाद सदाभाऊ खोत
Posted by Sadabhau Khot on Tuesday, 25 August 2020
अन्य महत्वाच्या बातम्या...
किम जोंग उन जिवंत! बोलावली आपत्कालीन बैठक; उत्तर कोरियाकडून पुन्हा फोटोद्वारे 'दर्शन'
CoronaVirus News लस टोचल्यानंतरही कोरोनाची लागण होणार? तेलंगानातील रिपोर्ट चिंता वाढविणारा
CoronaVirus News: गंभीर इशारा! थंडीत लस अशक्य; पण कोरोनाची दुसरी मोठी लाट येण्याची शक्यता
कौन बनेगा? तुम्ही देखील बनू शकता करोडपती; रोज फक्त 30 रुपये बाजुला काढा