“श्रीकृष्णरुपी देवेंद्र फडणवीसांच्या मदतीने कंस मामाला गाडल्याशिवाय राहणार नाही”

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 01:52 PM2022-05-21T13:52:33+5:302022-05-21T13:53:53+5:30

शरद पवार यांना कधीही शेतकऱ्यांचा जाणता राजा मुळीच म्हणणार नाही, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.

sadabhau khot said bjp devendra fadnavis will come again as a chief minister of the state | “श्रीकृष्णरुपी देवेंद्र फडणवीसांच्या मदतीने कंस मामाला गाडल्याशिवाय राहणार नाही”

“श्रीकृष्णरुपी देवेंद्र फडणवीसांच्या मदतीने कंस मामाला गाडल्याशिवाय राहणार नाही”

Next

पंढरपूर: गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यातच आता रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर टीका केली आहे. यावेळी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाष्य करताना, होय राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री म्हणून येणार आहेत. यावर आमचा ठाम विश्वास आहे. पण आम्हाला आता वेगळे देवेंद्र फडणवीस बघायचे आहे, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. 

देवेंद्र फडणवीस तुम्ही राज्यात पुन्हा येणार आहात. त्यावेळी मात्र बारामतीच्या गड्यांना आत घेवू नका, असे आवाहन सदाभाऊ खोत यांनी यावेळी केले. उजनीतून बारामतीला एक थेंब ही पाणी जाऊ देणार नाही. पालकमंत्र्यांनी‌ कंस मामाची भूमिका घेऊ नये अन्यथा श्रीकृष्ण रूपी देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने कंस मामाला आम्ही गाडल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला.

शरद पवारांना मी शेतकऱ्यांचा जाणता राजा मुळीच म्हणणार नाही

दुसऱ्या एका कार्यक्रमानंतर मीडियाशी बोलताना, शरद पवार यांना कधीही शेतकऱ्यांचा जाणता राजा मुळीच म्हणणार नाही. राज्यात सहकारी चळवळीचे श्राद्ध घालण्याचे काम बारामतीकरांनी केले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकांसह सहकारी संस्था यांनी संपुष्टात आणल्या. शेतकरी उभा करण्याचे काम केले नाही. शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यांचा प्रपंच मातीत मिळसला, अशी घणाघाती टीका सदाभाऊ खोत यांनी केले. 

दरम्यान, शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने तुळजापूर दौऱ्यावर गेलेल्या माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अभिनेत्री केतकी चितळे हिची पाठराखण केली होती. सदाभाऊ खोत यांनी केलेल्या या समर्थनानंतर सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्या अंगावर धावून गेले. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अचानक अंगावर आल्याने सदाभाऊ आणि सोबतचे कार्यकर्ते भेदरून गेले. मी केतकीच्या पोस्टचे समर्थन केले नाही. केतकी न्यायालयात खंबीरपणे उभी राहिली याबद्दल मी बोललो, असे सदाभाऊ सांगू लागले. सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी प्रसंगावधान राखून कार्यकर्त्यांची समजूत काढली.
 

Web Title: sadabhau khot said bjp devendra fadnavis will come again as a chief minister of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.